मुंबई: सकाळचा नाश्ता हा दिवसाच्या ऊर्जा पुरवठ्याचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो. अनेक लोक नाश्त्यासाठी ओट्स निवडतात कारण ते हलके, पचायला सोपे आणि आरोग्यदायी असतात. पण दररोज एकसारखे साधे ओट्स खाऊन अनेकांना कंटाळा येतो. म्हणूनच ओट्सचा थोडा वेगळा आणि चविष्ट पर्याय हवा असेल, तर ओट्स उपमा हा उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी केवळ हेल्दीच नाही तर झटपट तयार होणारीही आहे. भाज्यांचा समावेश केल्यामुळे ती अधिक पौष्टिक बनते