
वर्धा : आपण रोजच्या आहारात जे पदार्थ खातो त्यांचं आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्व बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं. आता रोजच्या आहारातील कांद्याची साल आपण कचरा पेटीत टाकून देतो. पण त्याचा केसांसाठी होणारा फायदा माहिती झाला तर तुम्ही अशी चूक कधीच करणार नाही. कारण कांद्याच्या सालीपासून केसांसाठी उपयुक्त टोनर बनवता येऊ शकते. वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे यांनी याबाबतच माहिती दिली आहे