
घरात पाहुणे आल्यास किंवा कमी वेळेत काहीतरी खास पेय बनवायचे असल्यास, पान सरबत (Paan Sharbat) हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला दरवेळी साहित्य जमवावे लागणार नाही; कारण एकदा मिश्रण (Concentrate) बनवून ठेवले की, वेळेवर कधीही सरबत तयार करता येते. या सरबताची खासियत म्हणजे ते आरोग्यवर्धक आहे. पानातील अनेक घटक शरीरासाठी उत्तम असतात, तर त्यात वापरले जाणारे सोप (बडीशेप) हे वजन कमी (Weight Loss) करण्यास मदत करतात. चवीला टेस्टी असणारे हे पान सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सारिका पापडकर यांनी सांगितली आहे.