कोल्हापूर : सध्याच्या युगात आपलं शरीर फिट ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. वजन नियंत्रित करण्यासाठी, काही लोक आपल्या आहारात अंडी आणि पनीरच सेवनही करतात, कारण दोन्हीमध्ये कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त असतात. आहार तज्ज्ञांच्या मते अंडी हे सुपरफूड आहे तर त्याचबरोबर जर आपण पनीरचा विचार केला तर यातही कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात आणि शाकाहारी लोकांसाठी पनीर हे वरदान आहे. पण आत्ताच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात अंडी किंवा पनीर खायला हवीत का? शरीर फिट ठेवायचं असेल तर कोणता बेस्ट ऑप्शन असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याबद्दल आहार तज्ज्ञ क्रांतिसिंह शिंदे काय सांगतात पाहुयात.