मुंबई: मराठी घराघरात प्रिय असलेला पारंपरिक खमंग चव असलेला पाटवडी हा पदार्थ अनेकदा विशेष प्रसंगी बनवला जातो. काही भागांत या स्वादिष्ट पदार्थाला थापी वडे असेही म्हणतात, हे फारच कमी लोकांना माहीत आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या पारंपरिक पदार्थाची लोकप्रियता आजही अबाधित आहे. घरगुती चव आणि सोपी कृती यामुळे पाटवडी हा कायमस्वरूपी मराठी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग ठरला आहे.