
पुणे : पुण्याच्या खाद्य पदार्थाची चव काही वेगळीच असून अनेकांना ती आपल्या प्रेमात पाडते. अनेकांचा आवडता पदार्थ म्हणजे मिसळ आणि मिसळमध्ये अनेक प्रकार ही आपल्याला पाहायला मिळतात. असंच पुण्यातील टिळक रोड इथे पिझ्झा मिसळ मिळते. हे ऐकून तुम्हाला ही नवलंच वाटेल पण या पदार्थाची चव काही वेगळीच असून ती खाण्यासाठी लोकांची गर्दी ही असते.