पुणे : पुण्याची खाद्य संस्कृती जगात नावाजली जाते. पुण्यात आजही शंभरी पार केलेली उपहारगृहे आहेत. तसेच येथील काही खास पदार्थ जगप्रसिद्ध आहेत. यातीलच एक पदार्थ म्हणजे पुणेरी मिसळ होय. पुण्यातील बुधवार पेठेत 1910 साली वैद्य उपहार गृह सुरू झालं. गेल्या 114 वर्षांपासून हे ठिकाण खाद्यप्रेमी पुणेकरांच्या आवडीचं बनलंय. येथील मिसळ पुण्यात खूप प्रसिद्ध असून पुण्यातील सर्वात जुनी मिसळ मानली जाते. याबाबत आपण जाणून घेऊ.