अमरावती: सतत काही तरी चटपटीत खावंसं वाटत. झटपट बनवणारे पदार्थ तर भरपूर असतात पण, बनवण्याचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही कुरकुरीत असे रव्याचे समोसे किंवा कुरकुरे बनवून ठेवू शकता. जे खाऊन तुम्हाला अगदी बाहेरील वेफर्स खाण्याचा फिल येईल. फक्त रवा वापरून बनवलेले हे पदार्थ खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो. बनवल्यानंतर अगदी 10 ते 15 दिवस हे पदार्थ सहज टिकतात. याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी सारिका पापडकर यांनी दिली आहे.