सोलापूर - दिवाळी सण हा काही दिवसांवर येऊन ठेपला असून सोलापूर शहरातील मित्र नगर येथे राहणारे संजय नामदेव निर्मळ बत्ताशे बनवण्याचं काम करत आहे. पारंपारिक पद्धतीने साखरेच्या पाकापासून बत्ताशे बनवण्याचा वारसा जपला आहे. साखरेपासून बत्ताशे कसे तयार केले जातात व हा व्यवसाय ते कधीपासून करत आहे,या संदर्भात अधिक माहिती संजय निर्मळ यांनी Local 18 शी बोलताना दिली आहे.