अमरावती: उपवास म्हटलं की, आपण साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर, शिरा अशा प्रकारचे पदार्थ बनवतो. त्याचबरोबर उपवासाचे पापड सुद्धा आपण या आहारात घेत असतो. पण, पापड तसेच खाताना थोडा कंटाळा येतो. उपवासाच्या पापडाची तीच ती चव चाखून कंटाळला असाल तर तुम्ही उपवासाची पापड चाट बनवू शकता. अगदी कमीत कमी साहित्यात ही पापड चाट तयार होते. तुम्हाला आवडत असणारे उपवासाचे सर्वच पदार्थ तुम्ही या चाटमध्ये टाकू शकता. उपवासाची पापड चाट कशी तयार करायची जाणून घेऊयात.\r\n