
मुंबई : अनेक जण नोकरी सोडून व्यवसायला प्रधान्य देत आहेत. चिंचपोकळीतील वैष्णवी देवळेकर हिने चार वर्षांचा नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर आयुष्यात मोठा निर्णय घेतला. कॉर्पोरेट आणि मेडिकल क्षेत्रात काम करत असताना तिला स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी वेळ मिळत नव्हता. स्वतःसाठी काहीतरी करायचंय या विचाराने प्रेरित होऊन वैष्णवीने नोकरीचा राजीनामा दिला आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय, श्री स्वामी समर्थ फूड कॉर्नर.