छत्रपती संभाजीनगर : दिवाळी म्हटलं की आपण सर्वजण आपल्या घरी छान टेस्टी असे वेगवेगळे फराळाचे पदार्थ तयार करत असतो. हे पदार्थ आपण तयार करताना तेलाचा किंवा तुपाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. पण पदार्थ करत असताना कशाचा वापर करावा? म्हणजेच तेलाचा, साजूक तुपाचा की डालडा तुपाचा वापर करावा? याविषयीच आपल्याला आहारतज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी माहिती सांगितली आहे.