छत्रपती संभाजीनगर : हिवाळ्यामध्ये उत्तम आरोग्यासाठी आहाराची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे अनेकजण थंडीच्या हंगामातील फळे आणि भाजीपाला खाण्याला प्राधान्य देतात. हिवाळ्यातील मुख्य पीक म्हणजे तूर आणि याच तुरीला या काळात मोठ्या प्रमाणात शेंगा आलेल्या असतात. या शेंगा बाजारात विक्रीसाठीही दिसतात. तुरीच्या शेंगा खाण्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.