मुंबई: आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना आणि मुलींना PCOD किंवा PCOS ही समस्या होत आहे. PCOS म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आणि PCOD म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर. हे दोन्ही हार्मोनसंबंधित विकार आहेत. हा त्रास मुख्यतः हार्मोन बिघडल्यामुळे होतो. यामुळे शरीरात काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात. PCOD/PCOS याचा संबंध प्रजनन क्षमता आणि शरीराच्या चयापचयाशी (metabolism) असतो. पण हा त्रास का होतो? आणि त्यावर उपाय काय आहेत? याबाबात मुंबईतील डॉ. जया सिंग यांनी माहिती दिलीये.