
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं वक्तव्य काँग्रेसबाबत केले आहे.ते काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणाले की," मी अजून माझं तोंड उघडलं नाही.पण ज्यादिवशी मी माझं तोंड उघडेल त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रभर नाही तर देशभर फटका बसेल."
Last Updated: Dec 25, 2025, 15:53 ISTकोल्हापूर : आजकालच्या बदलत्या युगात गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडकडे वाढता कल दिसून येतोय. ही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून केली जाते. याचा अल्पबचतीतून मोठा फायदा होतो. त्यामुळे लोक एकावेळी अनेक एसआयपी सुरू करतात. काहीजणांना कालांतरानं एसआयपी भरणं कठीण होतं. मग एक वेळ अशी येते की, एसआयपी थांबवायची किंवा पूर्ण बंद करायची. मात्र यापैकी नेमकं काय योग्य आहे, याबाबत अनेकजणांचा गोंधळ उडतो. हाच गोंधळ आज आपण सोडवणार आहोत. गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांनी याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
Last Updated: Dec 25, 2025, 15:37 ISTराज्यात महानगर पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.त्यातच आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत असे समजले असता, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, "लोकांमध्ये संभ्रमासारखी अवस्था झालीय. पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय दोनही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. ते एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही.आम्ही स्वतंत्र लढू"
Last Updated: Dec 25, 2025, 14:53 ISTमहानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेना उबाठाने नवीन उमेदवारांना संधी देण्याचं जाहीर केले आहे.खासदार विनायक राऊत यांच्या बोलण्यावरुन उबाठा गटातील नेत्यांच्या नातलगांची वर्णी लावण्याची धडपड सुरु असल्याचं समजतं.
Last Updated: Dec 25, 2025, 14:30 ISTपुणे : एअर-कंडिशन्ड कंपनी, चांगला पगार आणि कॉर्पोरेट जीवनशैली सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस फार थोडे लोक करतात. मात्र पुण्यातील खुशबू पटवा यांनी हे धाडस करून दाखवले आहे. ब्रँड कम्युनिकेशन मॅनेजर म्हणून कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या खुशबू यांनी आपली नोकरी सोडून जेकेटीज पॅनविच या नावाने स्वतःचा पॅनविच व्यवसाय सुरू केला असून, आज त्या चांगला नफा मिळवत यशस्वी उद्योजिका ठरत आहेत.
Last Updated: Dec 25, 2025, 14:26 IST