
विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई: वाढदिवस असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर सजावटीसाठी आपण फुग्यांचा वापर करतो. पण, सजावटीसाठी वापरणाऱ्या हायड्रोजन फुग्यांमुळे एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. गोरेगाव पश्चिम भागात अनमोल टॉवर या इमारतीत वाढदिवसाची पार्टी होती. त्यामुळे सजावटीसाठी हायड्रोजननं भरलेले फुगे घेऊन लिफ्टमधून जात होते. त्यावेळी अचानक फुग्यांचा स्फोट झाला. या स्फोटात ३ जण जखमी झाले आहे.