
मराठमोळी डान्सिंग क्वीन गौतमी पाटील हिने यंदाची होळी ठाणेकरांच्या सोबतीने मोठ्या उत्साहात साजरी केली. एरवी केवळ फोटोशूटसाठी रंग लावणाऱ्या गौतमीने यंदा प्रथमच रंगात न्हाऊन निघत मनसोक्त मज्जा केली. ठाण्यातील अफाट गर्दी पाहून गौतमी भारावून गेली. महिला वर्गाकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल तिने विशेष कौतुक केले. मुलाखतीदरम्यान गौतमीने तिच्या बालपणीच्या खानदेशातील होळीच्या आठवणींना उजाळा दिला. गावाकडे मैत्रिणींसोबत केलेली मज्जा तिला आज पुन्हा आठवली. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल तिने अभिजित दादा पवार आणि जितेंद्र दादा आव्हाड यांचे मनापासून आभार मानले.