TRENDING:

काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगताप यांचं मोठं वक्तव्य,VIDEO

राज्यात सर्व पक्षांमध्ये नेत्यांचं इन आऊट सुरुच आहे. आजच नेते प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले," राजकारण बंद करेन पण काँग्रेसमधून आता जाणार नाही. ज्या काँग्रेस पक्षाला शिव, फुले,शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा आहे, पक्षाला नेहरु आणि गांधींची विचारधारा आहे, त्या पक्षात मी सहभागी होण्याचा निर्णय घेतला."

Last Updated: Dec 26, 2025, 19:56 IST
Advertisement

"आमची युती आहेच,फक्त जागावाटप.." फडणवीस नेमकं काय म्हणाले ? VIDEO

Politics

सध्या युती झालेल्या पक्षांमध्ये जागावाटपावरुन मोठी चर्चा पाहायला मिळते. यातच आता महायुतीचं कुठे अडलंय? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर देत म्हणाले की, "आम्ही एकत्रच आहोत. ते वेगळे होते. आमची युती आहेच. फक्त जागावाटप जाहीर करायंचं आहे. आम्ही एकत्रच, घोषणेची आवश्यकताच नाही."

Last Updated: Dec 26, 2025, 21:44 IST

जळगावात बापाकडून नवजात मुलीची हत्या, VIDEO

जळगाव जामनेर तालुक्यातील मोराड गावातील ही एक धक्कादायक घटना आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन दिवसाच्या नवजात लहान मुलीच्या डोक्यात लाकडी पाट मारुन हत्या केली आहे. मुलगा हवा या हव्यासापोटी ही हत्या झाल्याचे समजले. या इसमाला पहिल्या तीन मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता त्यामुळे त्याने हे विकृत कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Last Updated: Dec 26, 2025, 21:30 IST
Advertisement

एकवीरा देवस्थान ट्रस्टमध्ये गैरव्यवहार ? , VIDEO

पुणे

मावळ कार्ल्यातील एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळेंवर कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप झाला आहे. देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी हे आरोप अध्यक्षांवर केले आहेत. पुजारी म्हणाले, "दानात मिळालेल्या सोन्या चांदींच्या वस्तुंवर त्यांनी डल्ला मारला आहे. ट्रस्टला न विचारता त्यांनी फॉरच्युनर गाडी देवस्थानच्या पैशातून घेतली. ती गाडी स्वतःसाठी आणि राजकीयदृष्ट्या रोज वापरत आहेत."

Last Updated: Dec 26, 2025, 21:16 IST

उत्तर महाराष्ट्रात गॅस सिलेंडरची टंचाई,VIDEO

सध्या उत्तर महाराष्ट्रात गॅस सिलेंडरची टंचाई भासताना दिसत आहे. कारण गॅस पुरवठा करणारे टँकर धारक आणि एचपी कंपनीचा करार संपला आहे. त्यामुळे नवीन करार कंपनीने केला नाही. या सगळ्याचा परिणाम मुंबईहून सिन्नर प्लांटला होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे असे वितरक सांगत आहेत.

Last Updated: Dec 26, 2025, 20:58 IST
Advertisement

अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी, VIDEO

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली. त्यांचं मुख्य कारण म्हणजे मिळालेल्या सलग सुट्ट्या. मंदिराच्या दर्शन मंडपाबाहेर भाविकांच्या दोन मोठ्या रांगा पाहायला मिळतात. लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. दोन ते तीन तास दर्शनासाठी भाविक रांगेत थांबले होते. लोकं पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात आले होते.

Last Updated: Dec 26, 2025, 20:44 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगताप यांचं मोठं वक्तव्य,VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल