TRENDING:

5.59 लाखांत 5-स्टार सुरक्षा! टाटा पंचचा नवीन अवतार; काय आहेत फीचर्स? Video

मुंबई : टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय मायक्रो SUV Tata Punch 2026 Facelift आज अधिकृतपणे लॉन्च केली आहे. सुरक्षितता, परवडणारी किंमत आणि मजबूत बांधणी यासाठी ओळखली जाणारी Tata Punch आता नव्या लुकमध्ये आणि अधिक आधुनिक फीचर्ससह ग्राहकांसमोर आली आहे. आजपासून म्हणजेच 13 जानेवारी 2026 पासून या गाडीची बुकिंग सुरू झाली असून, सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹5.59 लाख ठेवण्यात आली आहे.

Last Updated: Jan 14, 2026, 13:13 IST
Advertisement

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का घालतात? हे आहे खरं कारण

छत्रपती संभाजीनगर : भारतीय संस्कृतीत सण-उत्सव केवळ आनंदासाठी साजरे केले जात नाहीत, तर त्यामागे धार्मिक, सामाजिक, ऋतूमानाशी संबंधित तसेच वैज्ञानिक कारणेही दडलेली असतात. प्रत्येक सणाची स्वतःची अशी एक ओळख असते. ठरलेले धार्मिक विधी, विशिष्ट पोशाख, पारंपरिक पदार्थ आणि लोकपरंपरा. नव्या वर्षाची सुरुवात होताच साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा पहिला महत्त्वाचा सण मानला जातो. देशभरात विविध नावांनी आणि विविध पद्धतीने हा सण साजरा होत असला, तरी त्यामागील मूळ भावार्थ एकच आहे. निसर्गाचे आभार मानणे आणि नव्या पर्वाची सुरुवात करणे.

Last Updated: Jan 14, 2026, 15:50 IST

मकर संक्रांतीला बनवा अस्सल पारंपारिक 'गुळपोळी'! थंडीत शरीराला देईल उष्णता, पाहा सोपी रेसिपी

Food

मुंबई : मकर संक्रांत आली की गुळपोळीची आठवण येतेच. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत मकर संक्रांती साजरी केली जाते. संक्रांतीच्या सणात तिळाचे लाडू, वड्या यांच्यासोबतच अनेक घरांमध्ये खास गुळपोळी केली जाते. थंडीत उष्णता देणारी आणि गोडव्याने नात्यांत गोडवा वाढवणारी ही गुळपोळी कशी करायची याची रेसिपी पाहूयात.

Last Updated: Jan 14, 2026, 14:47 IST
Advertisement

तिळगुळ होणार नाहीत कडक, पाकात बनवा झटपट रेसिपी, संपूर्ण Video

कल्याण : नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संक्रांत म्हटले की सगळीकडे तिळगुळ बघायला मिळतात. परंतु तिळगुळ बनवताना हलगर्जीपणा केला तर तिळगुळ ठिसूळ न होता कडक होतात. त्यामुळे सहसा लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती तिळगुळ खाणे कंटाळा करतात. आज आपण तिळगुळ आणि चिक्की बनवण्यासाठी कोणत्या टिप्स आणि साहित्य किती प्रमाणात घ्यावे हे बघणार आहोत.

Last Updated: Jan 14, 2026, 14:37 IST

पुण्यातील 'या' बेकरीत मिळतायत चॉकलेटचे तिळगुळ; परंपरा आणि आधुनिकतेचा गोड संगम

पुणे

पुणे : मकर संक्रांती म्हणजे गोडवा, आनंद आणि आपुलकीचा सण. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या परंपरेनुसार तिळगुळ वाटण्याची प्रथा आजही तितकीच जिवंत आहे. मात्र, काळानुरूप बदल स्वीकारत पुण्यातील सोमवार पेठेतील मूर्ती बेकरीने या पारंपरिक सणाला आधुनिकतेची गोड जोड दिली आहे. गेली अनेक वर्ष विविध सणांनिमित्त चॉकलेटचे खास पदार्थ बनवणारी ही बेकरी मकर संक्रांतीसाठी खास तिळगुळ चॉकलेट तयार करत असून ते पुणेकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

Last Updated: Jan 14, 2026, 13:46 IST
Advertisement

पापड विक्रीतून महिन्याला १ लाखांची कमाई! संभाजीनगरच्या कल्पना यांनी उभारलं साम्राज्य !

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील करमाड येथील कल्पना गायकवाड यांनी उमेद रमाई महिला स्वयंसहायता समुहाअंतर्गत 12 प्रकारच्या पापडांच्या विक्रीचा व्यवसाय उभारला आहे. त्या स्वतः पापडाची निर्मिती करतात आणि विक्री करतात. त्यामध्ये तांदळाचे पापड, साबुदाणा पापड, बटाटा पापड, ओनियन रिंगसह विविध प्रकारच्या पापडांची स्टॉलच्या माध्यमातून तसेच घरून देखील विक्री केली जाते. त्यांचे स्टॉल ग्रामीण भागासह छत्रपती संभाजीनगर शहरातही लावलेले असतात. या व्यवसायामुळे 13 महिलांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 1 लाख रुपयांची कमाई होत असल्याचे कल्पना गायकवाड यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: Jan 14, 2026, 13:34 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
5.59 लाखांत 5-स्टार सुरक्षा! टाटा पंचचा नवीन अवतार; काय आहेत फीचर्स? Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल