TRENDING:

पांडेंच्या पक्षप्रवेशाला आमदार फरांदेंचा (भाजप) आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध, VIDEO

नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उबाठाचे नेते विनायक पाडेंच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे.भाजपच्या मुळ कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष पक्ष वाढवण्यासाठी काम केले आहे. पण आता विनायक पांडे भाजप पक्ष प्रवेश करणार आहेत.त्यामुळे या सगळ्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा विरोध सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Last Updated: Dec 25, 2025, 16:35 IST
Advertisement

मुंबई-एक्स्प्रेस वेवर 4 किमी रांगा,ट्रॅफिक जामचा LIVE VIDEO

खंडाळा : नाताळानिमित्ताने सुट्टी असल्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेळेवर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. आज सकाळपासून पुणे लेनवर वाहनाच्या रांगा लागल्या आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच सण साजरा करण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडल्याने महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. महामार्ग पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक्सप्रेस वेवर दाखल दाखल झाले आहे. बोरघाटात ४ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. (अनिस शेख, प्रतिनिधी)

Last Updated: Dec 25, 2025, 19:36 IST

भाजप आमदार फरांदे बोलताना भावूक अन् डोळ्यात पाणी..VIDEO

नेते विनायक पांडे,यतीन वाघ,शाहू खैरे,दिनकर पाटील यांनी आज भाजप पक्षात भरती झाले.पण भाजपातील काही नेते मंडळी यावरुन नाराज आहेत असे दिसले. नाशिक मध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "कार्यकर्ते वर्षानुवर्ष कामं करतात.निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसतात. पण बाहेरुन आलेला एक आणि त्याच्यासोबत तीन दिले तर पक्ष विजयी होईल."

Last Updated: Dec 25, 2025, 18:55 IST
Advertisement

आरसा फक्त चेहरा बघायला नसतो! मुलांच्या प्रगतीसाठी आरसा ठरू शकतो गुरू

Viral

आजच्या धावपळीच्या युगात पालकांनो, तुमची मुलं एकलकोंडी किंवा रागीट होत आहेत का? त्यांच्यातील कमी होत असलेला आत्मविश्वास ही चिंतेची बाब ठरू शकते. पण यावर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय पुण्याच्या समुपदेशक उमा पाटील यांनी सुचवला आहे, तो म्हणजे \'मिरर टॉक\'. आरशासमोर उभं राहून स्वतःशी संवाद साधल्याने मुलांची देहबोली, उच्चार आणि आत्मविश्वास कसा वाढतो? आरशातल्या प्रतिबिंबाला \'गुरू\' मानल्याने मुलांच्या भविष्यात काय बदल होतील? जाणून घेण्यासाठी हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा !\r\n

Last Updated: Dec 25, 2025, 19:19 IST

गडकरींनी सांगितले उमेदवारांचे गमतीदार किस्से, VIDEO

भाजप मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरच्या एका कार्यक्रमातील भाषणात त्यांच्या पार्टीचे गमतीदार किस्से सांगितले आहेत. ते म्हणाले,"प्रत्येक व्यक्ती वाट पाहत आहे की निवडणुक कधी आहे आणि मला ते तिकिट देऊन कधी पाठवणार.लोक म्हणतात, तुम्हाला कोण दुसरं मिळालं नाही का ?"

Last Updated: Dec 25, 2025, 18:15 IST
Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य ड्रोन शो..VIDEO

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज पासून सुरु करण्यात आलं. तेव्हा विमानतळ सुरु होण्यापूर्वी हा ऐतिहासिक क्षण कायम उपस्थितांच्या स्मरणात राहण्यासाठी एक नेत्रदीपक ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होत.त्यात अनेक आकर्षक आकृती साकारण्यात आल्या होत्या.

Last Updated: Dec 25, 2025, 17:44 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नाशिक/
पांडेंच्या पक्षप्रवेशाला आमदार फरांदेंचा (भाजप) आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल