TRENDING:

Political Report : विलासरावांबद्दलच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण यांची दिलगिरी, VIDEO

Politics

महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यातच उडी घेत अभिनेता रितेश देशमुखनं वडिलांच्या या वादग्रस्त वक्तव्याचं चोख उत्तर दिलं. पण रवींद्र चव्हाण या वादात अडकले.त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Last Updated: Jan 06, 2026, 19:27 IST
Advertisement

फक्त एक आवळा आणि १० आजार पळवून लावा! हिवाळ्यात 'या' वेळी आवळा खाण्याचे चमत्कारिक फायदे !

छत्रपती संभाजीनगर: आयुर्वेदात आवळा हे फळ अत्यंत आरोग्यदायी मानलं जातं. हिवाळ्यात आवळा खाण्याचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे आहेत. त्यामुळे रोज एक आवळा खाल्ल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. आंबट-तुरट चवीचा आवळा शरीरासाठी अनेक पोषक तत्त्वांचा खजिना मानला जातो. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी माहिती दिलीये.

Last Updated: Jan 07, 2026, 18:02 IST

मधुमेही रुग्णांसाठी पेरू वरदान! वजन घटवण्यासाठी रोज किती पेरू खावा? आहारतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

छत्रपती संभाजीनगर : उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदात फलाहार महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे येत असतात. आता हिवाळा सुरू असून या काळात पेरूचा हंगाम असतो. त्यामुळे आता बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. पेरू आरोग्यासाठी अत्यंत लाभादायी मानला जातो. पेरू खाण्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात? याविषयी छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ञ्ज मंजू मठाळकर यांनी माहिती दिलीये.

Last Updated: Jan 07, 2026, 17:38 IST
Advertisement

Makar Sankranti 2026: स्पेशल तिळाची भाकरी, बनवा एकदम सोप्या पद्धतीने, रेसिपीचा संपूर्ण Video

Food

मुंबई : थंडीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. तीळ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्याचे जास्त सेवन केले जाते. तसेच सणानिमित्त तिळाचे पदार्थ केले जातात. थंडीच्या दिवसात येणारा पहिलाच सण हा मकर संक्रांत असतो. संक्रांतिनिमित्त सर्वत्र तिळाच्या पदार्थांचे सेवन जास्त केले जाते. तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तिळाची भाकरी असे वेगवेगळे तिळाचे पदार्थ आपण सर्वत्रच पाहतो. पण काळानुसार पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्रात भोगीला तिळाची भाकरी केली जाते. तिळाची भाकरी कशी करावी? याची रेसिपी आपल्याला सायली तोडणकर यांनी सांगितली आहे.

Last Updated: Jan 07, 2026, 16:49 IST

चेहरा चांगला ठेवण्यासाठी होईल मदत, पाहा हिवाळ्यात तीळ खाण्याचे आश्यर्यकारक फायदे

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की सर्वत्र थंडी असतेच आणि थंडी पडली की आपल्या शरीर देखील थंड होतं. तर हिवाळ्यामध्ये शरीर उष्ण ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचे असते म्हणजे तीळ खाणं. कारण तीळ हे उष्ण असतात. तर हिवाळ्यामध्ये तीळ खाण्याचे आपल्या शरीर काय फायदे होतात? याविषयी आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Jan 07, 2026, 15:08 IST
Advertisement

Shengole Recipe: गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा चटपटीत शेंगोळे,एकदम टेस्टी!

अमरावती : हिवाळ्यात अनेकदा चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. परंतु बाहेरील अन्नपदार्थ खायचे म्हटलं तर आरोग्य बिघडण्याची भीती असते. मग घरच्या घरी काय बनवायचं, जे चटपटीत आणि पौष्टीकसुद्धा असेल? असा प्रश्न पडल्यास तुम्ही 'शेंगोळे' बनवू शकता. शेंगोळे हा पदार्थ अतिशय टेस्टी लागतो आणि घरगुती साहित्यांपासून तयार होतो. अमरावती येथील गृहिणी रसिका शेळके यांनी शेंगोळ्यांची रेसिपी सांगितली आहे.

Last Updated: Jan 07, 2026, 14:28 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Political Report : विलासरावांबद्दलच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण यांची दिलगिरी, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल