काय बोलताय हे तुम्ही! अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर डबल मिनिंग पोस्ट, नको नको तो अर्थ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Amitabh Bachchan Post : अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. काहींनी तर बिग बींना त्यांच्या वयाचीही आठवण करून दिली आहे.
advertisement
1/7

बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात. त्यांच्या पोस्टचं वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या प्रत्येक पोस्टला नंबर देतात आणि त्या मोजक्यात शब्दात असतात. ज्या खूप विचित्र असतात, त्यांचा अर्थ काहीच समजत नाही.
advertisement
2/7
नुकतीच अमिताभ यांनी केलेली एक पोस्ट जी अनेकांना इतकी विचित्र वाटली आहे की त्यामुळे खळबळ उडाली आहे. सगळे लोक त्याचा नको नको तो अर्थ लावत आहेत.
advertisement
3/7
अमिताभ यांनी या पोस्टमध्ये फक्त तीन शब्द लिहिले आहेत. हा एक प्रश्न आहे. पण त्याचा अर्थ आता काय घ्यायचा. लोकांच्या यावर कमेंट्स पाहाल तर कित्येकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
4/7
याचा अर्थ समजून घेण्यासाठी काही जण ग्रोक या एआय टूलचा वापर करत आहेत. अमिताभ बच्चन यांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्यांच्या वाक्याचा अर्थ काय? असं ग्रोकला विचारलं आहे.
advertisement
5/7
पण काहींनी अमिताभ यांना ट्रोलही केलं आहे. अमिताभ यांचं हे वाक्य म्हणजे डबल मिनिंग वाटतं. यावर एका युझरने म्हातारपणात तुम्ही हे काय अश्लील बोलत आहात, अशी कमेंट केली आहे.
advertisement
6/7
आता अमिताभ यांनी ही पोस्ट नेमकी आहे तरी काय? एक्स अकाऊंटवरील ही पोस्ट. ज्याचा नंबर T5690 आहे. या पोस्टमध्ये त्यांनी फक्त तीन शब्द लिहिले आहेत. 'दिलं की नाही?'
advertisement
7/7
दुसरीकडे अमिताभ यांनी फेसबुकवर एक पोस्ट आहे, जो एक्सवरील याच पोस्टचा दुसरा पार्ट किंवा त्याचं उत्तर वाटतं आहे. ज्यात अमिताभ "देत राहा, देत राहा, देत राहा... ते परत येईल" असं सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
काय बोलताय हे तुम्ही! अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर डबल मिनिंग पोस्ट, नको नको तो अर्थ