Dhurandhar 2 Blunder: 'धुरंधर २' मध्ये आदित्य धरची घोडचूक! नेटकऱ्यांनी थेट पुरावाच दिला, तुमच्या लक्षात आली?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2 Blunder: आदित्य धर हे त्यांच्या उत्कृष्ट डिटेलिंगसाठी ओळखले जातात. एखाद्या फिल्ममधील त्यांचे बारकावे प्रेक्षकांना वेळोवेळी थक्क करतात. मात्र, अशातच या मोठ्या दिग्दर्शकाकडून मोठी चूक झाली आहे.
advertisement
1/8

मुंबई : 2026 चा सर्वाधिक चर्चेत सिनेमा म्हणजे धुरंधर २. या फिल्मने पहिल्याच वीकेंडमध्ये बॉलिवूडचे रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली आहे. रणवीर सिंग आणि आदित्य धर ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेक्षक अक्षरशः या फिल्मच्या प्रेमात पडत आहेत.
advertisement
2/8
आदित्य धर हे त्यांच्या उत्कृष्ट डिटेलिंगसाठी ओळखले जातात. एखाद्या फिल्ममधील त्यांचे बारकावे प्रेक्षकांना वेळोवेळी थक्क करतात. मात्र, अशातच या मोठ्या दिग्दर्शकाकडून मोठी चूक झाली आहे. ही चूक इतकी मोठी आहे की, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर याचे पुरावेच सादर केले आहेत.
advertisement
3/8
'धुरंधर द रिव्हेंज' मधील एका महत्त्वाच्या फाइट सीनमध्ये आदित्य धर यांच्याकडून एक मोठी तांत्रिक चूक झाली आहे. या सीनमध्ये हमजा आणि त्याचा मित्र पिंडा यांच्यात एका बाथरूममध्ये जोरदार हाणामारी होते. हा सीन इतका थ्रिलर आहे, पण याच सीनमध्ये ही चूक झाल्याचं प्रेक्षकांना लक्षात आलं आहे.
advertisement
4/8
रणवीर सिंगच्या या महत्त्वाच्या फाइट सीनमध्ये जेव्हा कॅमेरा फिरतो, तेव्हा बॅकग्राउंडला असलेल्या आरशामध्ये चक्क कॅमेरामन आणि त्याचा कॅमेरा स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर या सीनचा एक फोटो तुफान व्हायरल झाला असून यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
5/8
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी या चुकीकडे दुर्लक्ष केलं असलं, तरीही अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
6/8
काहींनी तर असेही म्हटलं आहे की, या फिल्मसाठी इतका गाजावाजा केला, पण या तांत्रिक चुका सुधारता आल्या नसल्याचं म्हणत फिल्मवर टीका केली आहे.
advertisement
7/8
आदित्य धर यांनी प्रत्येक फ्रेमवर इतकी मेहनत घेतली असताना, एडिटिंग टेबलवर ही चूक कोणाच्याच लक्षात कशी आली नाही? असा सवालही आता विचारला जात आहे.
advertisement
8/8
दरम्यान, फिल्मची पहिल्याच आठवड्यातील कमाई पाहता, हा सिनेमा या वर्षीचा सर्वांत मोठा ब्लॉकबस्टर ठरणार असल्याची खात्री प्रेक्षकांना वाटतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 Blunder: 'धुरंधर २' मध्ये आदित्य धरची घोडचूक! नेटकऱ्यांनी थेट पुरावाच दिला, तुमच्या लक्षात आली?