
पुणे : सध्याच्या धावत्या जीवनशैलीतून आध्यात्मिक शांती अनुभवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. यापैकीच एक म्हणजे पुण्यातील हवेली तालुक्यातील ह.भ.प. अक्षय कामठे. अक्षय यांनी नुकतीच पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असून ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी त्यांना जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे. अक्षय कामठे हे पुणे यार्डमध्ये तरुण व्यापारी म्हणून ओळखले जातात. आपली संसारिक जबाबदारी सांभाळत त्यांनी ही परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. याविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.