TRENDING:

Tallest Skyscrapers : तुम्ही पाहिल्यात जगातील 8 सर्वात उंच बिल्डिंग्ज? बुर्ज खलिफा नंतर लागतो 'या' इमारतीचा नंबर!

Last Updated:
Tallest Buildings In The World : जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, अनेक अनाकलनीय घटना घडत असतात. त्यांपैकी बहुतांश नैसर्गिक असतात. मात्र जगात अशा काही इमारती आहेत, ज्या अत्यंत उंच आहेत. या मानवनिर्मित आश्चर्याबद्दल आज आपण माहिती घेत आहोत. चला पाहूया जगातील सर्वात उंच इमारती कोणत्या आहेत.
advertisement
1/11
जगातील 8 सर्वात उंच बिल्डिंग्ज! बुर्ज खलिफा नंतर लागतो 'या' इमारतीचा नंबर..
खरं तर इतकं उंच बांधकाम करणं खूप अवघड असतं. कारण उंचीवर हवेचा दाब खूप जास्त असतो. उंचीवर हवेला वाहण्यासाठी अडथळा आल्यास हवा तो अडथळा स्वतःच दूर करते, म्हणजेच इमारत पडण्याची शक्यता असते. यामुळे उंचीवर बांधकाम करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाची आवश्यकता असते.
advertisement
2/11
जगातील या सर्वात उंच इमारती शेकडो मीटर उंच आहेत आणि त्यांच्याबद्दल अनेक कथा आहेत. यातील काही इमारती व्यवसाय केंद्रे आहेत, तर काही लक्झरी हॉटेल्स आणि निवासस्थाने म्हणून विकसित केलेल्या आहेत.
advertisement
3/11
बुर्ज खलिफा : दुबईमधील या इमारतीबद्दल जवळपास सर्वानाच माहित आहे. प्रत्येकाचं एकदा तरी इथे जाण्याचं स्वप्न नक्कीच असतं. बुर्ज खलिफा 828 मीटर उंच आहे आणि यामध्ये 163 मजले आहेत. सध्या तरी बुर्ज खलिफापेक्षा जास्त उंच इमारत बनलेली नाही.
advertisement
4/11
मर्डेका 118 : ही इमारत क्वालालंपूर मलेशिया येथील आहे. बुर्ज खलिफा नंतर याच इमारतीचा नंबर लागतो. या इमारतीला पीएनबी 118 म्हणून देखील ओळखले जाते. या बिल्डिंगची उंची 678.9 मीटर आहे. ही जगातील दुसरी आणि आग्नेय आशियातील सर्वात उंच इमारत आहे.
advertisement
5/11
शांघाय टॉवर : चीनमधील शांघाय टॉवर जगातील तिसरी सर्वात उंच इमारत आहे. या टॉवरची उंची 632 मीटर आहे आणि यामध्ये 128 मजले आहेत. त्याची वक्र रचना जोरदार हवेचा दाब कमी करण्यास मदत करते.
advertisement
6/11
मक्का क्लॉक रॉयल टॉवर : ही इमारत सौदी अरेबिया येथे आहे. या इमारतीची उंच 601 मीटर आहे. टॉवर मक्कामध्ये जगातील सर्वात मोठे घड्याळ आहे. या इमारतीमध्ये 120 माजले आहेत. ही इमारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे.
advertisement
7/11
पिंग एन फायनान्स सेंटर : चीनमधील शेन्झेन येथे असलेले हे टॉवर स्टील आणि काचेच्या इमारतीचे एक आकर्षक आणि उत्तम उदाहरण आहे. या इमारतीमध्ये जगातील सर्वात वेगवान लिफ्ट सिस्टीमपैकी एक सिस्टीम आहे.
advertisement
8/11
लोटे वर्ल्ड टॉवर : हे टॉवर दक्षिण कोरियामधील सोलमध्ये आहे. हे टॉवर 555 मीटर उंच आहे. या टॉवरची रचना पारंपारिक कोरियन कलेपासून प्रेरित आहे. या टॉवरमध्ये एक शॉपिंग एरिया, लक्झरी निवासस्थाने आणि एक प्रतिष्ठित हॉटेल आहे.
advertisement
9/11
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : यूएसए न्यू यॉर्कमध्ये ही इमारत आहे. आणि तिची उंची 1,776 फूट उंच आहे. ही इमारत ताकद आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानली जाते. या इमारतीचा अष्टकोनी आकार आणि मजबूत पाया तिला इतर इमारतींपेक्षा वेगळे बनवतो.
advertisement
10/11
ग्वांगझू सीटीएफ फायनान्स सेंटर : चीनमधील ही इमारत 541 मीटर उंच आहे आणि ती ग्वांगझू शहरातच आहे. ही बहुउपयोगी इमारत तिच्या विशिष्ट बाह्य डिझाइनसाठी ओळखली जाते. (All Images Credit : Canva)
advertisement
11/11
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tallest Skyscrapers : तुम्ही पाहिल्यात जगातील 8 सर्वात उंच बिल्डिंग्ज? बुर्ज खलिफा नंतर लागतो 'या' इमारतीचा नंबर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल