IND vs WI मॅचमध्ये पाऊस पडला तर काय होणार... सेमी फायनलला भारत जाणार का वेस्ट इंडिज?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता ऐन रंगात आला आहे. आतापर्यंत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन टीम सेमी फायनलला पोहोचल्या आहेत. तर उरलेल्या दोन जागांसाठी चार टीममध्ये रेस आहे.
advertisement
1/8

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये आता ग्रुप 1 मधून भारत किंवा वेस्ट इंडिज तर ग्रुप 2 मधून न्यूझीलंड किंवा पाकिस्तान या दोन टीमच पोहोचू शकतात. पाकिस्तानचं भवितव्य न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातल्या सामन्यावर अवलंबून आहे.
advertisement
2/8
न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला तर पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल, पण इंग्लंडने न्यूझीलंडला हरवलं तर पाकिस्तानला श्रीलंकेवर मोठा विजय मिळवावा लागेल, तरच पाकिस्तानची टीम सेमी फायनलला पोहोचू शकते.
advertisement
3/8
दुसरीकडे रविवार 1 मार्चला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात सामना रंगणार आहे. या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल ती टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
advertisement
4/8
सुपर-8 स्टेजमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला तर झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केलं, त्यामुळे आता टीम इंडियाच्या खात्यात 2 सामन्यांमध्ये 2 पॉईंट्स आहेत. तर वेस्ट इंडिजचेही 2 मॅचमध्ये 2 पॉईंट्स आहेत. वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला आणि त्यांनी झिम्बाब्वेवर विजय मिळाला.
advertisement
5/8
भारत-वेस्ट इंडिज सामन्यावेळी कोलकात्यामध्ये पाऊस पडला आणि हा सामना रद्द झाला, तर दोन्ही टीमना एक-एक पॉईंट मिळेल, त्यामुळे भारत-वेस्ट इंडिजचे 3-3 असे समसमान पॉईंट्स होतील. मग सेमी फायनलला कोणती टीम पोहोचणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
6/8
पावसामुळे सामना रद्द झाला तर ज्या टीमचा नेट रनरेट चांगला असेल ती टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा +1.791 एवढा आहे, तर भारताचा नेट रनरेट मायनस 0.100 आहे, त्यामुळे मॅच रद्द झाली तर वेस्ट इंडिज सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
advertisement
7/8
टीम इंडियासाठी दिलासादायक बाब म्हणजे रविवारी कोलकात्यामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोलकात्यामध्ये रविवारी 0 टक्के पावसाची शक्यता आहे. दिवसा तापमान 34 डिग्री आणि मॅचवेळी 25-26 डिग्रीच्या आसपास असेल.
advertisement
8/8
कोलकात्याची खेळपट्टी बॅटिंगसाठी स्वर्ग मानली जाते. झिम्बाब्वेविरुच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या संघर्ष करणाऱ्या खेळाडूंना सूर गवसला, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार सूर्यकुमार यादवला दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs WI मॅचमध्ये पाऊस पडला तर काय होणार... सेमी फायनलला भारत जाणार का वेस्ट इंडिज?