TRENDING:

'निष्ठावान पुरुष प्रत्येक कोपऱ्यात आहेत, दुर्दैवाने...' पहाटे ३.२० वाजता अमिताभ यांची विचित्र पोस्ट; नेटकऱ्यांना जया अन् रेखा यांची आठवण

Last Updated:
Amitabh Bachchan Blogs: शुक्रवारी पहाटे ३:२० वाजता अमिताभ बच्चन यांनी एक अशी पोस्ट केली की, इंटरनेटवर एकाएकी खळबळ उडाली.
advertisement
1/9
पहाटे ३.२० वाजता अमिताभ यांची विचित्र पोस्ट; नेटकऱ्यांना जया अन् रेखा यांची आठवण
मुंबई : बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे केवळ त्यांच्या दमदार आवाजासाठी आणि अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या हजरजबाबीपणासाठीही ओळखले जातात. वय ८३ झाले असले तरी, बिग बींचा उत्साह आणि सोशल मीडियावरील त्यांचा ह्युमर एखाद्या तरुणालाही लाजवेल असा आहे.
advertisement
2/9
शुक्रवारी पहाटे ३:२० वाजता अमिताभ बच्चन यांनी एक अशी पोस्ट केली की, इंटरनेटवर एकाएकी खळबळ उडाली. वफादारी आणि पृथ्वीचा आकार यांचा संबंध जोडत त्यांनी असा काही टोला लगावला की नेटकऱ्यांनी थेट जया बच्चन आणि रेखा यांचं नाव ओढायला सुरुवात केली.
advertisement
3/9
ज्यावेळी अवघा देश साखरझोपेत होता, तेव्हा बिग बींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक खोचक पण मजेदार विचार मांडला. त्यांनी लिहिलं, "वफादार माणसं जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात मिळतात, पण दुर्दैव असं की आपली पृथ्वी गोल आहे!" (Loyal men are found in every corner of the world, but unfortunately, the earth is round).
advertisement
4/9
एकाच वाक्यात त्यांनी परफेक्ट माणसाच्या शोधावर जी मार्मिक टिप्पणी केली, ती पाहून चाहते थक्क झाले. कोपरा नसल्यामुळे वफादार माणूस मिळणं अशक्य आहे, असं सुचवत अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांना पहाटे पहाटे खळखळून हसायला लावलं.
advertisement
5/9
अमिताभ यांची ही पोस्ट व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला. काही जणांनी बिग बींच्या हजरजबाबीपणाचं कौतुक केलं, तर काही जणांनी या प्रकरणाला कौटुंबिक वळण दिलं.
advertisement
6/9
एका युजरने लिहिलं, "जया मॅडम कोपऱ्यात बसून रडत असतील, त्यांना सांगू नका की घर सुद्धा गोल आहे!" दुसऱ्याने चक्क थेट विषयाला हात घालत म्हटलं, "जयाजी, आता तरी अमितजींचा फोन सोडा!"
advertisement
7/9
काही जुन्या चर्चांना उजाळा देत एक जण म्हणाला, "हे वाचून रेखाजींना काय वाटेल?" एका चाहत्याने म्हटलं, "कोणाकडे पोहोचण्याआधीच आपण पुन्हा सुरुवातीला येतो, हीच मोठी समस्या आहे!"
advertisement
8/9
अमिताभ बच्चन सध्या प्रचंड व्यग्र आहेत. नाग अश्विन यांच्या 'कल्की २' (Kalki 2898 AD Sequel) च्या चित्रीकरणासाठी ते हैदराबादमध्ये घाम गाळत आहेत. नुकतंच त्यांनी सेटवर कमल हासन यांची भेट घेतल्याचे फोटो शेअर केले होते.
advertisement
9/9
तसेच, रिभू दासगुप्ता दिग्दर्शित 'सेक्शन ८४' (Section 84) हा त्यांचा कोर्टरूम ड्रामा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ते निम्रत कौर, अभिषेक बॅनर्जी आणि डायना पेंटी यांच्यासोबत दिसणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'निष्ठावान पुरुष प्रत्येक कोपऱ्यात आहेत, दुर्दैवाने...' पहाटे ३.२० वाजता अमिताभ यांची विचित्र पोस्ट; नेटकऱ्यांना जया अन् रेखा यांची आठवण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल