Extra Marital Affairs : ना पतीची भीती, ना समाजाची पर्वा… 35 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण का वाढतंय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अशा घटना समोर आल्या की आपण चटकन त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर बोट ठेवतो. पण, एखादी व्यक्ती सुखी संसारात असताना बाहेरच्या व्यक्तीकडे का आकर्षित होते? या मागे कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात? कधी विचार केलाय?
advertisement
1/7

लग्न, संसार आणि मुलं... या चक्रात अडकलेली प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्ष कुटुंबासाठी खर्ची घालत असते. सुरुवातीची वर्ष प्रेमात आणि उत्साहात जातात, पण जसजसं वय वाढत जातं, तसं नात्यातले रंग फिके पडू लागतात. अलीकडेच सोशल मीडियावर एका प्रसिद्ध कंपनीच्या CEO आणि त्यांच्या HR हेडच्या अफेअरची चर्चा रंगली होती. अशा घटना समोर आल्या की आपण चटकन त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर बोट ठेवतो. पण, एखादी व्यक्ती सुखी संसारात असताना बाहेरच्या व्यक्तीकडे का आकर्षित होते?
advertisement
2/7
35 ते 40 वयोगटातील महिलांच्या बाबतीत हा प्रश्न अधिक गंभीर आहे. बदलत्या काळानुसार केवळ पुरुषच नाही, तर महिलाही लग्नाबाहेर नातं शोधताना दिसतात. हे 'चीटिंग' केवळ शारीरिक आकर्षणातून नसतं, तर त्यामागे अनेक खोलवर रुजलेली मानसिक कारणं दडलेली असतात. चला तर मग, या संवेदनशील विषयाचा थोडा जवळून विचार करूया.
advertisement
3/7
35 ते 40 हे वय असं असतं, जिथे महिला घराची जबाबदारी, मुलांचं शिक्षण आणि नोकरी यात पूर्णपणे गुरफटलेली असते. ती उत्तम आई, कर्तव्यदक्ष पत्नी आणि सून म्हणून सर्वांची काळजी घेते. पण हे सगळं करताना तिचं स्वतःचं अस्तित्व कुठे तरी हरवून जातं. घरातील व्यक्तींना तिच्या कष्टाची सवय होते आणि हळूहळू तिला गृहीत धरलं जातं (Taken for granted).जेव्हा तिला स्वतःच्याच घरात 'इमोशनल इन्विझिबल' (कोणीही न दिसणारी व्यक्ती) वाटू लागतं, तेव्हा तिचं मन अशा कोणातरी व्यक्तीचा शोध घेऊ लागतं, जी तिला 'माणूस' म्हणून पाहिल.
advertisement
4/7
भावनिक ओढ आणि एकटेपणाअनेकदा लग्नानंतर काही वर्षांनी पती-पत्नीमधील संवाद केवळ घरगुती गरजा आणि मुलांपुरता उरतो. या वयात महिलांना शारीरिक सुखापेक्षाही जास्त कोणाच्या तरी आधाराची, समजून घेण्याची आणि कोणाशी तरी मनमोकळं बोलण्याची गरज असते. जेव्हा पतीकडून हा 'इमोशनल सपोर्ट' मिळत नाही, तेव्हा बाहेरून मिळणारी थोडीशी सहानुभूती किंवा मैत्री कधी 'अफेअर'मध्ये बदलते, हे त्या महिलेच्याही लक्षात येत नाही.
advertisement
5/7
35 ते 40 या वयात महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. अनेकदा संसाराच्या रुटीनमध्ये त्यांना स्वतःच्या सौंदर्याची किंवा आवडीनिवडीची विस्मरण झालेलं असतं. अशा वेळी जेव्हा ऑफिसमध्ये किंवा मित्रपरिवारात एखादी व्यक्ती त्यांच्या कामाचं कौतुक करते, त्यांच्यावर लक्ष देते किंवा त्यांना विशेष वागणूक देते, तेव्हा तो बदल त्यांना ताजी हवा देणाऱ्या झुळुकीसारखा वाटतो. हेच आकर्षण त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यास प्रवृत्त करू शकतं.
advertisement
6/7
नाती टिकवण्यासाठी केवळ आर्थिक सुरक्षितता किंवा मुलांची जबाबदारी पुरेशी नसते. नात्यात संवाद, एकमेकांचा आदर आणि भावनिक गुंतवणूक असणं तितकंच महत्त्वाचं आहे. 'चीटिंग'चे समर्थन कधीच होऊ शकत नाही, पण त्यामागची कारणं समजून घेतल्यास वेळीच सावध होऊन संसार विस्कटण्यापासून वाचवता येऊ शकतो.
advertisement
7/7
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Extra Marital Affairs : ना पतीची भीती, ना समाजाची पर्वा… 35 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण का वाढतंय?