थलापथी विजयचा 25 वर्षांचा संसार मोडणार, पत्नी संगीताचा घटस्फोटासाठी अर्ज, आरोप ऐकून पायाखालची जमीन सरकेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Thalapathy Vijay Divorce: विजयची पत्नी संगीता हिने चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी धाव घेतल्याने दक्षिणेकडील राजकारण आणि सिनेसृष्टी दोन्ही सुन्न झाले आहेत.
advertisement
1/9

ज्याला तमिळ जनता आपला 'थलापथी' मानते, ज्याच्या एका इशाऱ्यावर लाखो चाहते जीव द्यायला तयार असतात, त्या विजय (Thalapathy Vijay) च्या वैयक्तिक आयुष्यात सध्या मोठं वादळ आलं आहे.
advertisement
2/9
गेले अनेक महिने ज्या चर्चा केवळ गॉसिप म्हणून दुर्लक्षित केल्या जात होत्या, त्या आता कोर्टाच्या कागदपत्रांपर्यंत पोहोचल्या आहेत. विजयची पत्नी संगीता हिने चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी धाव घेतल्याने दक्षिणेकडील राजकारण आणि सिनेसृष्टी दोन्ही सुन्न झाले आहेत.
advertisement
3/9
विजय आणि संगीता यांची जोडी ही सिनेसृष्टीतील सर्वात आदर्श जोडी मानली जात असे. पण या नात्याला कुणाची तरी नजर लागली आहे. घटस्फोटाच्या अर्जात संगीताने जे कारण दिलंय, ते ऐकून चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
advertisement
4/9
विजयचे एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आणि आरोप संगीताने केला आहे. एका बाजूला राजकीय कारकीर्द सावरताना विजयला आता स्वतःच्या चारित्र्यावर लागलेला हा डाग पुसण्याचं मोठं आव्हान समोर उभं राहिलं आहे.
advertisement
5/9
हा वाद एका रात्रीत निर्माण झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपं गेल्या दोन वर्षांपासून वेगळं राहत होतं. हळूहळू वाढलेला हा दुरावा, संपलेला संवाद आणि अविश्वासाची भिंत आता इतकी मोठी झाली की, संगीताला कोर्टाचा दरवाजा ठोठावणं भाग पडलं.
advertisement
6/9
१९९९ मध्ये विजय आणि संगिताचं लग्न झालं असून त्यांना दोन मुलं आहेत. मात्र आता तब्बल २५ वर्षांचा हा संसार आता मोडकळीस आला आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी २० एप्रिल रोजी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात होणार आहे.
advertisement
7/9
सुनावणीवेळी कोर्ट दोघांना एकत्र येण्यासाठी वेळ देणार की घटस्फोटाची प्रक्रिया पुढे सरकणार, याकडे संपूर्ण तामिळनाडूचं लक्ष लागलं आहे. संगीताने ज्या अभिनेत्रीचं नाव या वादात ओढलंय, ती कोण? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.
advertisement
8/9
विजयने नुकताच आपला राजकीय पक्ष 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) स्थापन केला असून २०२६ च्या विधानसभा निवडणुकांसाठी तो सज्ज झाला आहे.
advertisement
9/9
राजकारणात प्रतिमा हीच मोठी संपत्ती असते. अशा वेळी स्वतःच्या पत्नीने केलेले हे गंभीर आरोप विजयच्या राजकीय भवितव्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. विरोधकांसाठी हे आयतं कोलित मिळालं असून, लोकांचा विश्वास संपादन करताना विजयची आता मोठी कसोटी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
थलापथी विजयचा 25 वर्षांचा संसार मोडणार, पत्नी संगीताचा घटस्फोटासाठी अर्ज, आरोप ऐकून पायाखालची जमीन सरकेल