TRENDING:

Fraud Alert: पेमेंट झाल्याचा आवाज येतोय, पण...,स्कॅनच्या नावाने नवा स्कॅम मार्केटमध्ये!

सोलापूर: फोन पे आणि गुगल पे सारख्या दिसणाऱ्या क्लोन ॲपमुळे नागरिक आणि व्यापाऱ्याचे फसवणूक होत आहे. हा ॲप दिसायला फोन पे सारखाच आहे, पेमेंट केल्यावर येणारा आवाज आणि पेमेंट हिस्टरी फोन पे सारखेच आहे. पण व्यापारी किंवा नागरिकांच्या अकाऊंटमध्ये पैसे जात नाही आणि यातच त्यांची फसवणूक होते. बनावट फोन ॲपद्वारे फसवणूक कशा प्रकारे होते व आपली फसवणूक झालीय हे कसं समजायचं या संदर्भात अधिक माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: November 15, 2025, 14:29 IST
Advertisement

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घ्यायची? पण स्कीन टाईप माहीत नाही? असा ओळखा, Video

अमरावती : त्वचा म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसा असते. आपल्याला जर एखादी आरोग्याची समस्या असेल, तर त्याचे परिणाम त्वचेवर दिसतात. प्रत्येक ऋतूमध्ये आपली त्वचा वेगळी दिसते. हिवाळ्यात आपल्या खानपानात अनेक बदल होतात. तसेच वातावरणात देखील बदल होतात. त्यामुळे त्वचा कोरडी होणे, बारीक पुरळ येणे, खाज सुटणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी अनेकजण मेडिकलमधील प्रॉडक्ट वापरतात. पण, आपला त्वचा प्रकार ओळखूनच प्रॉडक्ट घेणे महत्त्वाचे आहे. कोणतेही प्रॉडक्ट वापरल्यास आपल्या त्वचेला हानी होऊ शकते. त्यासाठी आपला त्वचा प्रकार ओळखणे गरजेचे आहे. त्वचा प्रकार कसा ओळखावा? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Last Updated: November 15, 2025, 18:26 IST

Winter Diet: हिवाळ्यात काय खावं अन् काय नको? उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला

पुणे

पुणे: हिवाळा सुरू झाला असून सर्वत्र गारठा वाढला आहे. वातावरणाच्या बदलामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात. या काळात आपली शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास आपल्याला आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहारात देखील बदल करणं गरजेचं असतं. या काळात आपला आहार कसा असावा? याबाबत डॉ. शर्वरी इनामदार यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे

Last Updated: November 15, 2025, 17:53 IST
Advertisement

Success Story : शेतकरी नव्हे CA वाल्या ताईंची कमाल, मराठवाड्यात यशस्वी केली केशरची शेती!

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा म्हणजे दुष्काळ आणि कोरडे हवामान, अशा प्रतिमेमुळे इथे केशर शेतीची कल्पनाही करणे कठीण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या येथील सीए प्रिया अग्रवाल यांनी या अशक्य वाटणाऱ्या संकल्पनेलाच आकार देत एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. जवळपास वर्षभर सातत्याने माहिती गोळा करून, अभ्यास करून आणि विविध तांत्रिक उपाय आजमावत त्यांनी आपल्या घरातील एका छोट्याशा खोलीत केशराची लागवड उभी केली आणि तब्बल 35 ग्रॅम शुद्ध केशरचे उत्पादन घेतले. आता या उपक्रमाला व्यावसायिक रूप देण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे प्रिया अग्रवाल यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: November 15, 2025, 16:25 IST

agriculture News : रब्बी पिकांची वाढ होईल चांगली, कोणत्या कराव्या उपाययोजना? संपूर्ण माहितीचा Video

बीड

बीड : हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच रब्बी पिकांची लागवड ग्रामीण भागात जोर धरते. गहू, हरभरा, ज्वारी, मटार, मोहरी अशा पिकांचे उत्पादन या हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, तापमानातील अचानक घट, दवबिंदूंची वाढ आणि थंडीच्या लाटेमुळे अनेकदा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

Last Updated: November 15, 2025, 16:07 IST
Advertisement

Mumbai Market : लग्नासाठी फक्त 15 रुपयांपासून इथेनिक बांगड्या, व्यवसायाठी खरेदीची संधी, मुंबई इथं आहे मार्केट

मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. साडी, लेहेंगा किंवा ट्रेंडी कुर्ती कोणताही पोशाख असो, त्याला उठावदार लुक देण्यासाठी बांगड्या हा महिलांचा आवडता दागिना आहे. अशा वेळी जर तुम्हालाही कमी भांडवलात इथेनिक ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मुंबईतील मालाड येथील क्रिस्टल प्लाझा मार्केट हे योग्य ठिकाण आहे.

Last Updated: November 15, 2025, 15:37 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Fraud Alert: पेमेंट झाल्याचा आवाज येतोय, पण...,स्कॅनच्या नावाने नवा स्कॅम मार्केटमध्ये!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल