
सोलापूर : अंजली आणि आकाश नारायणकार हे सोलापूरमधील लोकप्रिय रीलस्टार कपल असून खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती-पत्नी आहेत. सोलापूरमध्ये राहणाऱ्या या कपलची खऱ्या आयुष्यातील संघर्षमय प्रेरणादायी प्रेम कथा आता मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात दिसणार आहे. सोलापुरातील अंजली आणि आकाश हे दोघेजण सोशल मीडियावर हसवणारे व्हिडिओ टाकून लाखोंचा चाहता वर्ग तयार केला आहे
Last Updated: November 10, 2025, 17:04 ISTकोल्हापूर : सर्पमित्र म्हणून काम करताना अनेक अडचणी येत असतात. सर्वात आधी पकडलेल्या मुक्या प्राण्याची आणि स्वतःच्या जीवाची देखील काळजी घ्यावी लागते. अनुभवी सर्पमित्र ही गोष्ट नेहमीच करत असतात. मात्र नवख्या सर्पमित्रांकडून बऱ्याचदा काही चुका घडल्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. कित्येकदा तर अनुभवी सर्पमित्रांनाही साध्या चुकीमुळे जीव गमावावा लागलेला आहे. त्यामुळेच नवख्या सर्पमित्रांनी नेमकी कोणती काळजी साप पकडताना घेतली पाहिजे याबाबत कोल्हापुरातील ज्येष्ठ सर्पमित्र धनंजय नामजोशी यांनी सांगितले आहे.
Last Updated: November 10, 2025, 18:32 ISTथंडगार पाण्यासाठी आजही अनेकजण आधुनिक फ्रीजऐवजी मातीच्या माठाला प्राधान्य देतात. माठातील पाणी केवळ नैसर्गिकरित्या थंड नसते, तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. मात्र, माठ खरेदी करताना अनेक लोकांसमोर एक प्रश्न उभा राहतो: लाल मातीचा माठ चांगला की काळ्या मातीचा? काही ठिकाणी पांढरे माठही दिसतात. माठाच्या मातीचा प्रकार आणि रंग याचा पाण्यावर आणि त्याच्या थंड क्षमतेवरखरंच काही परिणाम होतो का?छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर दिले आहे. माठ निवडताना रंगापेक्षा अधिक महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि उत्तम मातीचा माठ कसा ओळखावा, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. माठाच्या या रंगाचे रहस्य आणि आरोग्यदायी पाण्याचे फायदे जाणून घ्या!
Last Updated: November 10, 2025, 17:39 ISTअमरावती : सद्यस्थितीमध्ये अनेकांच्या आहारातून तूप कालबाह्य झाले आहे. कारण तूप आहारात घेतल्यास वजन वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, हृदयविकाराचा धोका, पचनावर परिणाम यांसारख्या समस्या निर्माण होतात. पण, तूप जर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आहारात घेतले तर त्याचे अनेक फायदे आहेत. अगदी केसांपासून ते हाडे मजबूत होण्यापर्यंत तूप खाण्याचे फायदे होतात. गरम जेवणात 1 ते 2 चमचे तूप आहारात घेतल्यास अनेक फायदे आहेत. गरम जेवणात तूप खाण्याचे महत्त्वाचे फायदे कोणते? चला तर जाणून घेऊ.
Last Updated: November 10, 2025, 16:32 ISTमुंबई: हिवाळा सुरु झाला की थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी आपली खरेदी सुरु होते. मग गिझर ते हिटर रॉड पासून ते अगदी गरम कपड्यांपर्यंत आपण सर्व काही घेतो. पण, पाणी गरम करण्यासाठी काय घ्यावं, गिझर योग्य की हिटर रॉड? असा प्रश्न देखील अनेकदा आपल्याला पडतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
Last Updated: November 10, 2025, 16:04 IST