
पुण्यातून नात्यांना काळिमा फासणारी आणि हृदय हेलावून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. टीव्ही (TV) पाहणाऱ्या मुलाला वडिलांनी फक्त 'टीव्ही बंद कर' असे सांगितले. या एका वाक्यामुळे संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली. एका क्षुल्लक गोष्टीवरून मुलाने आपले बाप-लेकाचे पवित्र नाते संपवले. या घटनेनंतर समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.
Last Updated: October 03, 2025, 15:48 ISTवर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तयार होणारे 'सरगुंडे' हे 'गावाकडचे नूडल्स' म्हणून ओळखले जातात. नॉन-फ्राय असलेले हे सरगुंडे चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी पौष्टिक असतात. तुम्हाला हा पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ कसा तयार करतात याची माहिती हवी आहे का? लगेच पाहा सरगुंडे तयार करण्याची सोपी पद्धत!
Last Updated: December 10, 2025, 20:25 ISTलोणार सरोवराजवळचे दैत्यसुदन मंदिर: लोणार सरोवराजवळ असलेले हे सुमारे ८०० वर्षांहून अधिक जुने मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. या मंदिराच्या बांधकामात होयसळ आणि चालुक्य स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. विशेष म्हणजे, मंदिराच्या दगडी खांबांवरील कोरीव काम काही ऐतिहासिक तज्ज्ञांच्या मते इराणमधील प्राचीन स्थापत्यशैलीशी साधर्म्य दर्शवते, ज्यामुळे याला 'इराणशी कनेक्शन' असल्याचे म्हटले जाते. हे मंदिर मूळतः विष्णू देवाला समर्पित आहे आणि लोणार सरोवराच्या निर्मितीमागील दैत्याला मारून विष्णूंनी पृथ्वीला वाचवल्याच्या पौराणिक कथेमुळे याला 'दैत्यसुदन' (दैत्याचा नाश करणारा) हे नाव पडले आहे. आज हे मंदिर पुरातन कला आणि स्थापत्यकलेचा एक अमूल्य ठेवा म्हणून ओळखले जाते.
Last Updated: December 10, 2025, 19:59 ISTमुंबईतील कुर्ला भागातील मालपुआ हा विशेष प्रसिद्ध आहे. विशेषत: रमजान महिन्यात इथं चांगलीच गर्दी होते. कुर्ल्यासह संपूर्ण मुंबईत फेमस असलेला हा मालपुआ कसा तयार होतो हे पाहूया
Last Updated: December 10, 2025, 19:26 ISTसोशल मीडियावर सतत व्हायरल होणारा आणि खवय्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला 'फूड माफिया' स्टॉल आज मुंबईची ओळख बनला आहे. पण या स्टॉलची सुरुवात झाली तरी कशी? लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर मुंबईकर तरुण जितेंद्र वाघेला याच्या डोक्यात वडापावला टक्कर देणाऱ्या 'बटर चिकन पाव'ची कल्पना आली. एका साध्या कल्पनेतून सुरू झालेला हा स्टॉल आज लाखो लोकांपर्यंत पोहोचला असून, त्याची Success Story प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे!
Last Updated: December 10, 2025, 18:50 ISTसोलापूरमधील 'शिक कढई'ने 45 वर्षांपासून आपली तीच अस्सल चव कायम जपली आहे. ही कढई इतकी फेमस आहे की, एकदा याची चव चाखल्यास ग्राहक पुन्हा-पुन्हा त्या चवीसाठी परत येतात!
Last Updated: December 10, 2025, 17:36 IST