Weather Alert: रविवारी हवा बिघडली, कल्याण-डोंबिवलीसाठी अलर्ट, आजचं हवामान कसं?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: मुंबईसह ठाणे आणि परिसरातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील हवामानात काही दिवसांपासून लक्षणीय बदल दिसून येत आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या गारठ्यामुळे तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, ढगाळ वातावरण निवळल्यानंतर अनेक भागात, विशेषतः मुंबईसह ठाणे जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी होऊन कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी काहीसा उकाडा जाणवत आहे. आज 25 जानेवारी रोजी कल्याण-डोंबिवलीसह परसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
गेल्या दोन दिवसांपासून हवामानात चढउतार होताना दिसत आहेत. कल्याण तालुक्यात थंडी ओसरल्याने रविवारी हवेत दमटपणा असून उकडा वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस तर कमाल 28 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. हवामानातील बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामान अंशतः ढगाळ आणि कोरडे असून तापमानात किंचित वाढ जाणवेल. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान 20 अंश सेल्सिअस राहील. सकाळच्या वेळी हवामानात हलका गारठा, तर दुपारनंतर उष्णता वाढेल.
advertisement
4/5
कल्याण डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान कोरडे आणि थंड राहील. किमान तापमान 18- 20 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28-38 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पहाटे आणि रात्री हलकी थंडी जाणवेल.
advertisement
5/5
बदलापूर शहरातील हवामान कोरडे आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 10 अंश सेल्सिअस तर कमाल 25 अंश सेल्सिअस राहील. दिवसा हलके वारे वाहतील, तर शहापूर व मुरबाड तालुक्यातील वाऱ्यांचा वेग सौम्य राहील. किमान तापमान 16-18 अंश सेल्सिअस तर कमाल 30- 32 अंश सेल्सिअस राहील. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: रविवारी हवा बिघडली, कल्याण-डोंबिवलीसाठी अलर्ट, आजचं हवामान कसं?