Car AC कोणत्या नंबरवर चालवल्याने मिळतं चांगलं मायलेज? लगेच करा चेक, वाचतील पैसे
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळ्यात कार चालवताना एसी हा खुप गरजेचा असतो. कारण प्रचंड उन्हामुळे आपली गाडी ही तापत असते. मात्र एसीचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या पैशांचीही बचत होऊ शकते.
advertisement
1/6

उन्हाळा सुरू होताच कारमध्ये एसी वापरणं हे अत्यंत गरजेचं होतं. कारण एसीचा वापर केल्याने कारमध्ये गारवा निर्माण होतो. बाहेरील तापमानाची आत जाणीव होत नाही. पण एसीचा वापर केल्याने मायलेजवर नक्कीच परिणाम होत असतो. कारण एसी थेट इंजिनमधून पॉवर घेत असतो. ज्यामुळे इंजिनवर अधीकचा दबाव येतो आणि फ्यूल जास्त खर्च होते.
advertisement
2/6
अनेक लोक हे एसीचा कमी वापर करतात. मात्र योग्य पद्धतीने वापर केला तर गारवा मिळेल यासोबतच चांगलं मायलेजही मिळेल. चला जाणून घेऊया एसीचा वापर करण्याची योग्य पद्धत जेणेकरुन कार गारही राहील आणि फ्यूलही कमी खर्च होईल.
advertisement
3/6
कोणत्या नंबरवर चालवावा एसी? : जास्तीत जास्त कारमध्ये एसीच्या फॅनची स्पीड 1, 2, 3 आणि 4 नंबरवर दिली जाते. यामध्ये 1 सर्वात कमी आणि 4 सर्वात जास्त स्पीड असते. तुम्ही नेहमी 3-4 नंबरवर एसी चालवत असाल तर कार लवकर गार होते. मात्र यामुळे इंजिनवर जास्त लोड येतो आणि फ्यूलही जास्त लागते.
advertisement
4/6
एसी 1 किंवा 2 नंबरवर चालवणे ही बेस्ट पद्धत आहे. या स्पीडवर कारचे केबिन हळुहळू गार होते आणि इंजनवर जास्त दबाव पडत नाही. यामुळे मायलेजही चांगलं मिळतं. तुमच्या कारमध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोल असेल तर तापमान 24 ते 26 डिग्रीच्या जवळपास ठेवणं योग्य मानलं जातं. यामुळे एसीला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि फ्यूलची बचत होते.
advertisement
5/6
उन्हाळ्यात मायलेज वाढवण्याच्या सोप्या टिप्स : उन्हाळ्यात कारचा योग्य वापर करुन तुम्ही मायलेज खुप वाढवू शकता. तुम्ही कार उन्हात उभी करत असाल तर लगेच एसी चालू करण्याऐवजी, पहिले खिडक्या ओपन करा. यामुळे आतील गरम हवा बाहेर पडेल आणि नंतर एसी लवकर गारवा देईल.
advertisement
6/6
एसीचा वापर करताना रीसर्कुलेशन मोडचा वापर करणंही फायदेशीर असते. यामुळे गार हवा वारंवार आत घुमते आणि केबिन लवकर गार होते. सोबतच जास्त उष्णता नसेल तेव्हा फक्त ब्लोअरचा वापर करणं बेस्ट ठरतं. वेळोवेळी एसीची सर्व्हिस करणेही गरजेचे आहे. यामुळे कूलिंग चांगली राहते आणि इंजिनवर एक्स्ट्रा दबाव पडत नाही. ज्यामुळे मायलेज चांगलं राहतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car AC कोणत्या नंबरवर चालवल्याने मिळतं चांगलं मायलेज? लगेच करा चेक, वाचतील पैसे