TRENDING:

'महिला आयोग अध्यक्षा अत्याचाराच्या मुखिया', रुपाली विरुद्ध रुपाली वाद पेटला; ठोंबरेंची जाहीर टीका

Last Updated:

आता विषय निघाला आहे, तर ती खूप लांबपर्यंत जाईल, असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यावेळी निमित्त ठरले आहे नाशिकमधील एका भोंदू बाबाचे बलात्कार प्रकरण. नाशिक क्राईम ब्रांचने बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेला अशोक खरात हा चक्क राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा 'गुरू' आणि निकटवर्तीय असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून रूपाली पाटील यांनी चाकणकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

advertisement

स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले असून, या बाबाच्या मोबाईलमध्ये 50 हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. भक्तांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन महिलांचे शोषण करणाऱ्या या नराधमाचे थेट संबंध महिला आयोगाच्या अध्यक्षांशी असल्याने पीडित महिलांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

advertisement

अभी बात निकली है तो..., रूपाली ठोंबरे पाटील आक्रमक

दुसरीकडे, रूपाली पाटील यांनी सोशल मीडियावरून चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या अध्यक्षाच जर अत्याचाराच्या मुखिया असतील, तर चाकणकर प्रेमींनी आता टाळ्या वाजवाव्यात, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 'आता विषय निघाला आहे, तर ती खूप लांबपर्यंत जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

advertisement

महिलांचे रक्षण कसं करणार? सुषमा अंधारेंचा  सवाल

या प्रकरणावर भाष्य करताना सुषमा अंधारे यांनी थेट चाकणकर यांच्या नैतिकतेवर बोट ठेवले आहे."महिलांचे शोषण करणारा बाबा जर रूपाली चाकणकर यांचा गुरू असेल, तर त्या महिलांचे रक्षण कसे करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर, चाकणकर या आरोपीने स्थापन केलेल्या संस्थेवर सदस्य असल्याची माहितीही समोर आली असून, खरात याने चाकणकर यांना आपली शिष्या मानल्याचा एक व्हिडिओही 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागला आहे.

advertisement

कोण आहे कॅप्टन अशोक खरात?

  • नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे.
  • तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो
  • नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता
  • अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात.
  • कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे.
  • 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत.
  • त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याचे मानले जाते.
  • टॉप व्हिडीओज

    सर्व पहा
    300 रुपयांना खरेदी करा अन् 500 ला विका, व्यवसायासाठी होलसेल भावात शर्ट्स, पिंपरीत हे आहे मार्केट
    सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'महिला आयोग अध्यक्षा अत्याचाराच्या मुखिया', रुपाली विरुद्ध रुपाली वाद पेटला; ठोंबरेंची जाहीर टीका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल