
ठाणे : लहान मुलांना किंवा घरातील इतर सदस्यांना मेथीची भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल. त्यातच हिवाळा म्हटले की मार्केटमध्ये सहज मिळणारी पालेभाजी म्हणजे मेथी. मेथीची भाजी, पराठे, मेथी सूप खाऊन कंटाळा आला असेल तर खमंग आणि कुरकुरीत मेथी पुरी तुम्ही बनवू शकतात. ही मेथी पुरी सर्वच जण आवडीने खातील.
Last Updated: Dec 23, 2025, 14:40 ISTमहानगरपालिकेच्या निवडणूकीमुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्या युतीची चर्चा राज्यभरात चालू आहे. त्यातच भाजपचे आमदार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, " दोन बंधू एकत्र येण्याच्या चर्चा, काही काळात दोन बंधू भेटत आहेत. एवढं असूनही काही उबाठाचे नगरसेवक आजही खऱ्या शिवसेनेकडे येत आहेत.ही स्थिती पुर्ण महाराष्ट्राची आहे."
Last Updated: Dec 23, 2025, 16:25 ISTछत्रपती संभाजीनगर: हिवाळा म्हटलं की मोठ्या प्रमाणात तुरीच्या शेंगा येत असतात. या तुरीच्या शेंगांपासून आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे तुरीच्या दाण्यांचा ठेचा. अतिशय टेस्टी असा ठेचा लागतो त्याबरोबर झटपट तयार होतो आणि यासाठी जास्त साहित्य देखील लागत नाही. हा ठेचा कसा करायचा? याची रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितली आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 16:18 ISTमहानगरपालिका निवडणूकीमुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्या युतीकडे पुर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांची युतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेना खासदार(उबाठा) संजय राऊत यांनी त्यांच्या X वरुन सांगितले आहे की "उद्या बारा वाजता.." . यावरुन त्यांनी युतीचं उत्तर दिले आहे असे समजते.
Last Updated: Dec 23, 2025, 16:09 ISTमहानगरपालिका निवडणूका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे सर्वांचं लक्ष हे शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या युतीकडे आहे.त्यातच शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत म्हणाले की, "उबाठा आणि मनसे यांच्यामध्ये युती झालेली आहेच.फक्त जागावाटपावर राजसाहेब आणि उद्धवजी यांनी एकत्र येवून या संदर्भात शेवटच्या फॉर्मुल्याची घोषणा करणं बाकी आहे."
Last Updated: Dec 23, 2025, 15:52 ISTडोंबिवलीच्या जिमखाना मैदानात वेगवेगळ्या रंगांच्या पडद्यांनी भारतमातेची मोझॅक कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीसाठी कलाकारांना नऊ दिवस लागले आहेत. 95 फुट उंची आणि 75 फुट रुंदी या कलाकृतीची आहे. तर या कलाकृतीसाठी अडीच लाखाहून अधिक रंगीबेरंगी पडद्यांचा या अद्भूत कलाकृतीसाठी वापर केला गेला. या कलाकृतीचे आणि कलाकरांचे 'वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया' अंतर्गत एक जागतिक विक्रम नोंदवला आहे. या कलाकृतीच्या कलाकारांची चेतन राऊत,वैभव प्रभू कापसे अशी नावे आहेत.
Last Updated: Dec 23, 2025, 15:28 IST