TRENDING:

Pakistan Terror Attack : पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी हल्ला, हल्ल्यात 9 दहशतवाद्यांसह 8 जवानांचा मृत्यू

Last Updated:

Pakistan News : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 8 जवान शहिद झाले असून 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील लष्कराच्या तळावर सोमवारी ( 18 नोव्हेंबर) दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 8 जवान शहिद झाले असून 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
पाकिस्तान हादरलं!
पाकिस्तान हादरलं!
advertisement

यापूर्वी 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी देशाच्या अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतात केलेल्या कारवाईदरम्यान दोन आत्मघाती बॉम्बर आणि एका वरिष्ठ दहशतवाद्यासह नऊ दहशतवाद्यांना ठार केले होते. पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी ही माहिती दिली होती. लष्कराच्या मीडिया विंगने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे बुधवारी रात्री उशिरा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.

advertisement

9 दहशतवादी मारले गेले

या भीषण चकमकीत, कायदा अंमलबजावणी एजन्सीच्या जवानांनी नऊ दहशतवाद्यांना ठार केले. मीडिया विंगने एका निवेदनात म्हटले आहे की, मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये दोन आत्मघाती हल्लेखोर आणि एका मोठ्या दहशतवादी गटाच्या नेत्याचा समावेश आहे. मारले गेलेले दहशतवादी सुरक्षा दल आणि नागरिकांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी होते, असे त्यात म्हटले आहे.

advertisement

सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त केली आहेत. मात्र, परिसरातील इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कारवाई सुरूच आहे. इस्लामाबादस्थित थिंक टँक सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज (CRSS) ने जारी केलेल्या तिसऱ्या तिमाही अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या 1523 च्या तुलनेत या वर्षाच्या फक्त तीन तिमाहीत 1534 मृत्यूची नोंद झाली आहे.

advertisement

सुरक्षा कर्मचारी आणि गुन्हेगारांसह एकूण 722 लोक मारले गेले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअर तरुणाने नोकरी सोडली, पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, आज आहे 45 कॅफेचा मालक
सर्व पहा

तिसऱ्या तिमाहीत नोंदवलेल्या ३२८ घटनांमध्ये नागरिक, सुरक्षा कर्मचारी आणि गुन्हेगारांसह एकूण ७२२ लोकांचा मृत्यू झाला. तर 615 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे.

मराठी बातम्या/विदेश/
Pakistan Terror Attack : पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी हल्ला, हल्ल्यात 9 दहशतवाद्यांसह 8 जवानांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल