अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियाद्वारे या हल्ल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तानने काबुल आणि बाग्रामवर केलेल्या हवाई घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. तालिबानने रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेट्टा येथील १२ व्या कॉर्प्सचे मुख्यालय आणि खैबर पख्तूनख्वामधील लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केले. यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याचा दावा तालिबान सरकारने केला. पुन्हा हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यास यापेक्षा भयंकर उत्तर देऊ," असा इशाराही दिला आहे.
advertisement
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या परिस्थितीला ओपन वॉर सुरू असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी एअरस्ट्राइकमध्ये २७० हून अधिक तालिबानी फायटर्सना ठार केलं. संतापलेल्या पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारताचा अफगाणिस्तानला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. "आम्ही परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तालिबान आता भारताच्या इशाऱ्यावर नाचत आहे असंही पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे.
या संघर्षादरम्यान अफगाणिस्तानने जलालाबादमध्ये पाकिस्तानचे एक फायटर जेट पाडल्याचा आणि त्याच्या वैमानिकाला जिवंत पकडल्याचा खळबळजनक दावा केला. अफगाण लष्कराचे प्रवक्ते वाहिदुल्ला मोहम्मदी यांनी याला दुजोरा दिला असला तरी, पाकिस्तानने मात्र ही बातमी 'पूर्णपणे खोटी' असल्याचे म्हटले आहे. तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद यांनी यांच्या दाव्यानुसार आतापर्यंत ५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचं सांगितलं. पाकिस्तानच्या हल्ल्याला तालिबान्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
