TRENDING:

अमेरिकेचा समुद्रातून इराणवर अटॅक; १७ जहाजं आणि सबमरीनचे तुकडे तुकडे! युद्धाचे 10 अपडेट्स

Last Updated:

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष समुद्रातही सुरू झाला आहे. अमेरिकेने इराणची १७ लष्करी जहाजं आणि एक सबमरीन नष्ट केली. मोजतबा हुसैनी खामेनेई नवे नेता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातला संघर्ष आता अवकाश आणि जमिनीपुरता मर्यादीत राहिला नसून तो समुद्रातही सुरू झाला आहे. समुद्रातही युद्ध पेटलं आणि खळबळ उडाली. मध्य-पूर्वेतील महायुद्ध आता जमिनीवरून समुद्रात पोहोचलं असून अमेरिकेने इराणला आजवरचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. अमेरिकन सेंट्रल फोर्सच्या कमांडरने एका व्हिडिओ मेसेजद्वारे खळबळजनक माहिती दिली आहे.
News18
News18
advertisement

अमेरिकेच्या आक्रमक कारवाईत इराणची १७ लष्करी जहाजं आणि एक महाकाय सबमरीन समुद्रातच नष्ट करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे इराणच्या नौदलाचे कंबरडे मोडले असून, संपूर्ण आखातात आता इराणचे एकही जहाज शिल्लक नसल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. समुद्रातही युद्ध पेटल्यामुळे खळबळ उडाली आहे. जगभरात टेन्शन वाढलं आहे. याचा परिणाम व्यापारावर शेअर मार्केटवर होणार आहे.

advertisement

समुद्रातून इराणचा खेळ खल्लास करण्याचा मानस

अमेरिकन कमांडरच्या म्हणण्यानुसार, अरबी खाडी, होर्मुझची सामुद्रधुनी आणि ओमानची खाडी या महत्त्वाच्या सागरी मार्गांवरून इराणचे वर्चस्व पूर्णपणे संपवण्यात आले आहे. इराणने आतापर्यंत ५०० हून अधिक बॅलिस्टिक मिसाइल्स आणि २,००० पेक्षा जास्त ड्रोन्स डागूनही अमेरिकेच्या या सागरी प्रहारामुळे इराण बॅकफूटवर गेला आहे. दुसरीकडे, लेबनान सीमेवर रॉकेट हल्ल्यांच्या इशाऱ्यामुळे सायरन वाजू लागले असून नागरिकांना तातडीने बंकरमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

advertisement

खामेनेईंच्या वारसाची घोषणा?

इराणमध्ये अयातुल्ला खामेनेई यांच्या निधनानंतर आता सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. इस्रायली प्रसारमाध्यमांच्या दाव्यानुसार, खामेनेई यांचा मुलगा मोजतबा हुसैनी खामेनेई यांना इराणचा नवा सर्वोच्च नेता म्हणून निवडण्यात आले आहे. अद्याप इराणने यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले नसले तरी, तज्ज्ञांच्या मते मोजतबा यांच्याकडेच नेतृत्व सोपवण्यात आले आहे. दरम्यान, खामेनेई यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी म्हणजेच मशहद येथे इमाम रजा यांच्या दर्ग्याजवळ दफन केले जाणार आहे.

advertisement

तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांची सुटका

युद्ध पेटल्याने तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. भारतीय दूतावासाने तत्परता दाखवत बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांना शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था दूतावासाकडून करण्यात आली आहे. "इतर भारतीय नागरिकांनी जिथे आहेत तिथेच राहावे, खिडक्यांपासून दूर राहावे आणि घराबाहेर पडणे टाळावे," असा सल्ला दूतावासाने दिला आहे.

advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या भविष्याबाबत मोठे विधान केले आहे. "अमेरिका आणि इस्रायलची लष्करी मोहीम संपल्यानंतर इराणच्या सत्ताकारणात बाहेरील व्यक्तीऐवजी तिथल्याच शासनातील एखाद्या योग्य व्यक्तीने सत्ता सांभाळणे हा सर्वोत्तम पर्याय असेल," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या विधानातून ट्रम्प यांनी इराणमध्ये 'सत्तापालटाचे' संकेत दिल्याचे मानले जात आहे.

इस्रायलचा द रोर ऑफ द ईगल पॅटर्न

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हवाई दलाच्या तळाला भेट देऊन 'द रोर ऑफ द ईगल' या मोहिमेचे कौतुक केले. ड्रोन ऑपरेटर्स आणि टेक्निकल टीमने ज्या पद्धतीने इराणचे हल्ले मोडून काढले, त्यावर नेतन्याहू यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, लेबनानमधील परिस्थिती बिघडल्याने अमेरिकेने बेरूत येथील आपले दूतावास सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरते बंद केले आहे.

मोजतबा खामेनेईंवर अमेरिका-इस्रायलची नजर?

मोजतबा यांचे नाव समोर आल्याने इराणच्या गोटात भीतीचे वातावरण आहे. मोजतबा सत्तेवर आल्यास ते थेट अमेरिका आणि इस्रायलच्या रडारवर येऊ शकतात, अशी भीती ज्येष्ठ धर्मगुरुंनी व्यक्त केली आहे. मंगळवारी या विषयावर दोन महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. विशेष म्हणजे, ज्या इमारतीवर हल्ला झाल्याचा दावा केला जात होता, ती इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

कतारमधील अमेरिकन तळावर इराणचा प्रहार!

युद्धाचा भडका आता शेजारील देशांमध्येही उडाला आहे. इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल उदैद एयर बेसला लक्ष्य केले. इराणने दोन बॅलिस्टिक मिसाइल्स डागली होती, त्यापैकी एक कतारच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाडली, मात्र दुसरी मिसाइल थेट तळावर जाऊन धडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कतारच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांचा संताप; स्पेनसोबतची डील रद्द!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहेत. इराणवर हल्ला करण्यासाठी स्पेनने आपली जमीन वापरू देण्यास नकार दिल्याने ट्रम्प यांनी स्पेनवर मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेची फायटर जेट्स स्पेनमध्ये पोहोचली होती, पण स्पेनने सहकार्य करण्यास नकार दिला. यावर भडकलेल्या ट्रम्प यांनी स्पेनसोबतची मोठी व्यापारी डील रद्द करण्याची घोषणा केली आहे.

इस्रायलने नाही, आम्ही त्यांना उकसावलं, ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

इराणवरील हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. ते म्हणाले, "लोक म्हणतात की इस्रायलने आम्हाला युद्धात ओढलं, पण सत्य उलट आहे. आम्हीच इस्रायलला इराणवर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केलं." स्पेनने सहकार्य न केल्यामुळे त्यांच्याशी व्यापार थांबवण्याबाबत लवकरच मोठा निर्णय घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठी बातम्या/विदेश/
अमेरिकेचा समुद्रातून इराणवर अटॅक; १७ जहाजं आणि सबमरीनचे तुकडे तुकडे! युद्धाचे 10 अपडेट्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल