या कारवाईदरम्यान कोणताही प्रतिकार झाल्याचे समोर आलेले नाही. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळावरून माघारी गेल्याचेही सांगण्यात आले. या कारवाईची माहिती BLA च्या प्रवक्ते जियंद बलोच यांनी दिली. त्यांनी सांगितले की, लवकरच याबाबत अधिक माहिती दिली जाईल. सध्या सुराब शहरात BLA च्या लढवय्यांकडून क्वेटा-कराची आणि सुराब-गिदर हायवेवर गस्त आणि शोध मोहिम राबवण्यात येत आहे.
advertisement
सुराब शहर हे क्वेटा आणि कराची यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग N-65 वर वसलेले असून, या शहराला धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्व आहे. सरकारच्या पुरवठा आणि प्रशासन यंत्रणेचा एक महत्त्वाचा दुवा सुराब आहे. त्यामुळे या शहरावर नियंत्रण मिळवणे हे पाकिस्तान सरकारसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
25 हजार लोकांना ठार केले, हजारो लोक बेपत्ता; मोदीजी, Please मदत करा
बलुच लिबरेशन आर्मीने नुकत्याच ‘ऑपरेशन हेरोफ’ अंतर्गत 71 हल्ल्यांचा दावा केला होता. सुराबवरील ताबा हा त्यांच्या नव्या रणनीतीचा भाग मानला जात आहे. याआधी BLA केवळ डोंगराळ भागात सक्रिय होती. मात्र आता त्यांनी थेट शहरी भागात प्रवेश करून सरकारला थेट आव्हान दिले आहे.
रशियाने मोठा डाव टाकला, चीनला सोबत घेऊन सुरू आहे खतरनाक गेमप्लान; भारताला...
सुराबच्या घटनेनंतर मस्तुंग, मंगोचर, झोब किंवा ग्वादर ही शहरेही लक्ष्य बनू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बलुच लिबरेशन आर्मीचा विद्रोह आता केवळ सीमित स्वरूपात न राहता व्यापक बनत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा यंत्रणांसाठी ही बाब गंभीर असून भविष्यात यावर कठोर पावले उचलणे गरजेचे ठरणार आहे.