TRENDING:

रिलायन्सच्या मदतीने अमेरिकेत उभारणार रिफायनरी, डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले आभार

Last Updated:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सासमधील ब्राउन्सविले बंदरावर नवीन तेल रिफायनरी प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पात रिलायन्स इंडस्ट्रीज मोठी गुंतवणूक करणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवण्याचे संकेत दिले. मागच्या ५० वर्षांतील सर्वात मोठ्या तेल रिफायनरी प्रकल्पाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात भारताची दिग्गज कंपनी 'रिलायन्स इंडस्ट्रीज' मोठी गुंतवणूक करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितल्याने जागतिक बाजारपेठेत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Donald Trump
Donald Trump
advertisement

५० वर्षांचा दुष्काळ संपणार!

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली की, टेक्सासमधील ब्राउन्सविले बंदरावर ही अद्ययावत रिफायनरी बांधली जाणार. ट्रम्प यांच्या मते, गेल्या ५० वर्षांत अमेरिकेत एकही नवीन रिफायनरी बांधली गेली नव्हती. हा प्रकल्प केवळ अमेरिकेचे ऊर्जा उत्पादन वाढवणार नाही, तर हजारो लोकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण करणार आहे.

advertisement

'रिलायन्स'ची गुंतवणूक आणि ट्रम्प यांचा दावा

या घोषणेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचा सहभाग. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, रिलायन्स या प्रकल्पात गुंतवणूक करेल. जरी रिलायन्सने अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नसले, तरी ट्रम्प यांच्या दाव्यामुळे भारतीय कॉर्पोरेट जगतात चर्चांना उधाण आले आहे. हा प्रकल्प ट्रम्प यांच्या "अमेरिका फर्स्ट" अजेंडाचा एक भाग मानला जात आहे.

advertisement

जगातील सर्वात 'स्वच्छ' रिफायनरी

ही रिफायनरी जगातील सर्वात अत्याधुनिक आणि पर्यावरणाला पूरक अशी क्लीन रिफायनरी असेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. सध्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा दबाव आहे. अशा काळात ही नवीन रिफायनरी अमेरिकेसह जगाची इंधन निकड भागवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

advertisement

इंधनाचे दर कमी होणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे की, सध्याची इ दरवाढ ही तात्पुरती आहे. अमेरिकेच्या लष्करी मोहिमांची उद्दिष्टे साध्य झाली आणि घरगुती ऊर्जा उत्पादन वाढले, तर भविष्यात पेट्रोल-डीझेलच्या किमतीत मोठी घट होऊ शकते.

मराठी बातम्या/विदेश/
रिलायन्सच्या मदतीने अमेरिकेत उभारणार रिफायनरी, डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले आभार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल