अमेरिकेनं विचार केला होत्या त्यापेक्षा जास्त इराण या युद्धात तक धरून हल्ला करत असल्यानं ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, कुवेतच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे F-15 हे अत्याधुनिक फायटर जेट क्षेपणास्त्र हल्ल्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे, इराणने या घटनेचा व्हिडिओ शेअर करत हे विमान पाडल्याचा दावा केला आहे. या भीषण अपघातात विमान जळून खाक झाले असले तरी, सुदैवाने दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. हे विमान गरगर हवेत फिरलं आणि आग लागली. विमान क्रॅश होत असताना वैमानिकाने पॅराशूटचा वापर करून आपले प्राण वाचवले.
advertisement
नेमकं काय घडलं? F-15 बनलं आगीचा गोळा
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अमेरिकेच्या F-15 लढाऊ विमानावर क्षेपणास्त्राने दबा धरून हल्ला करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लढाऊ विमान आगीचा गोळा बनलं. विमानाचा मागील भाग पूर्णपणे पेटला होता. हे विमान अमेरिकन हवाई दलाचे होते की इस्रायलचे, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
वैमानिक सुखरूप; पॅराशूटने वाचवला जीव
विमान कोसळत असल्याचे लक्षात येताच, दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखून विमानातून 'इजेक्ट' केले. पॅराशूटच्या मदतीने ते सुरक्षितपणे जमिनीवर उतरले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं आहे.
हा अपघात झाला की हल्ला, यावर चर्चा सुरू असतानाच इराणने या घटनेचा व्हिडिओ जारी करून हे विमान पाडल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेने कुवेतमधील अमेरिकन दूतावासातून धुराचे लोट निघत असल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही घटनांमुळे खाडी देशांमध्ये युद्धाचे ढग अधिक गडद झाले असून अमेरिकेची पुढील पावलं काय असतील, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
कुवेतमध्ये भीतीचे वातावरण
कुवेतच्या हवाई क्षेत्रात झालेल्या या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली आहे. अमेरिकन दूतावासाजवळील धुरामुळे परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. इराण-इस्रायल संघर्षाचा केंद्रबिंदू आता कुवेतच्या दिशेने सरकतोय का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
