कुवेतमधील अली अल सलेम हवाई तळावर अमेरिका आणि इटालियन सैन्य आहे, तिथे ड्रोन हल्ला करण्यात आल्याचं इटलीच्या सरकारने सांगितलं आहे. इटालियन संरक्षण प्रमुख लुसियानो पोर्तोलानो यांनी लष्कराने जारी केलेलं निवेदनात हे म्हटलं आहे. 'आज सकाळी, कुवेतमधील अली अल सलेम हवाई तळाला लक्ष्य करण्यात आले. या तळावर अमेरिकन आणि इटालियन लष्करी दल तैनात आहेत. सर्व सैनिक सुरक्षित आहेत पण एक विमान नष्ट झाले आहे', अशी माहिती पोर्तोलानो यांनी सांगितलं आहे.
advertisement
युद्ध परिस्थितीमुळे सैन्य कमी
गेल्या काही दिवसात या प्रदेशातील वाढत्या सुरक्षा धोक्यामुळे हवाई तळावर तैनात असलेल्या सैन्याची संख्या कमी करण्यात आली आहे. सध्या या तळावर उपस्थित असलेले सैन्य महत्त्वाचे काम करण्यासाठी समर्पित आहे, असं इटालियन संरक्षण प्रमुखांनी सांगितलं.
आखाती देशांमधील कोणतेही अमेरिकन तळ किंवा सहयोगी देशांना सोडणार नसल्याचा इशारा इराणने याआधी दिला होता, त्यानंतर आता कुवेतमधील अमेरिका आणि इटलीच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
नाटोची एन्ट्री होणार?
इटली आणि अमेरिका दोघेही नाटोचे महत्त्वाचे सदस्य आहेत, त्यामुळे या संघर्षात आता नाटोची एन्ट्री व्हायची शक्यता आहे. इराणने उडवलेल्या ड्रोनने यापूर्वी तुर्की आणि फ्रान्समधील तळांना लक्ष्य केले आहे. पण तेव्हा नाटोने कोणतेही गंभीर विधान जारी केलेले नाही.
