TRENDING:

Iran War: इराणच्या नव्या टार्गेटनं अमेरिकेची धास्ती वाढली, लष्करी तळानंतर आता निशाण्यावर कोण?

Last Updated:

Iran US Conflict : इराणने आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेच्या लष्करी तळांना उद्धवस्त केल्यानंतर आता आपलं नवीन टार्गेट ठरवलं आहे. इराणच्या या टार्गेटने अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान: अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध पुकारुन महिना उलटला असला तरी कोणताही तोडगा, मध्यस्थी झाली नाही. इराणने अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेचं मोठं नुकसान झाल्याने या देशांच्या चिंतेत भर पडली आहे. तर, दुसरीकडे अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांचं, प्रकल्पाचं नुकसान झाले आहे. इराणने आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेच्या लष्करी तळांना उद्धवस्त केल्यानंतर आता आपलं नवीन टार्गेट ठरवलं आहे. इराणच्या या टार्गेटने अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे.
 इराणच्या नव्या टार्गेटनं अमेरिकेची धास्ती वाढली, लष्करी तळानंतर आता निशाण्यावर कोण?
इराणच्या नव्या टार्गेटनं अमेरिकेची धास्ती वाढली, लष्करी तळानंतर आता निशाण्यावर कोण?
advertisement

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ लष्करी तळांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इराणने आता आपली रणनीती बदलली आहे. अमेरिकेच्या संरक्षण दलाची 'लाईफलाईन' समजल्या जाणाऱ्या औद्योगिक क्षेत्रावर हल्ला चढवला आहे. आखाती देशांमधील मोठ्या अॅल्युमिनियम उत्पादक कंपन्यांना लक्ष्य करून इराणने अमेरिकेच्या लष्करी ताकदीला खिळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.

इराणचे नवे 'टार्गेट' काय?

advertisement

इराणने संयुक्त अरब अमिरातीतील 'एमिरेट्स ग्लोबल अॅल्युमिनियम' (EMAL) आणि 'अॅल्युमिनियम बहरीन' (ALBA) यांसारख्या महाकाय प्रकल्पांना निशाणा बनवले आहे. हे केवळ कारखाने नसून जागतिक पुरवठा साखळीतील महत्त्वाचे दुवे आहेत. येथून उत्पादित होणारे अॅल्युमिनियम थेट अमेरिका आणि युरोपमधील विमान उड्डाण (Aerospace) आणि संरक्षण उत्पादन क्षेत्राला पुरवले जाते.

अॅल्युमिनियम अमेरिकेसाठी महत्त्वाचे का?

अमेरिकन संरक्षण परिसंस्थेत अॅल्युमिनियमला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लढाऊ विमानांचे सांगाडे आणि संरचनेत याचा मोठा वापर होतो. क्षेपणास्त्रांची बाह्य आवरणे आणि हलकी रचना यासाठी हे आवश्यक आहे. गंजरोधक युद्धनौका बनवण्यासाठी अॅल्युमिनियमचा वापर केला जातो. उपग्रह आणि अंतराळ मोहिमांमध्ये याचा मोठा वाटा असतो.

advertisement

जागतिक पुरवठा साखळीवर होणारा परिणाम

अमेरिका पूर्णपणे आखाती देशांतील अॅल्युमिनियमवर अवलंबून नसली, तरी जागतिक बाजारपेठ एकमेकांशी जोडलेली आहे. EMAL किंवा ALBA मधील उत्पादनात किंचितही अडथळा आला, तर, जगभरातील खरेदीदारांची पर्यायी पुरवठ्यासाठी धावपळ होईल. समुद्री वाहतुकीचे मार्ग अधिक कठीण होतील.

अॅल्युमिनियमच्या किमतीत मोठी वाढ होईल, ज्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण बजेटवर ताण पडेल.

advertisement

आर्थिक युद्धाची ठिणगी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेती करावी तर अशी, पारंपरिक पद्धतीला फाटा देत केली हुरडा ज्वारी लागवड, आता लाखांत कमाई
सर्व पहा

आतापर्यंत इराण-अमेरिका संघर्ष लष्करी तळ किंवा तेलवाहू जहाजांपुरता मर्यादित होता. मात्र, आता इराणने थेट लष्करी क्षमता वाढवणाऱ्या औद्योगिक कच्च्या मालावर हल्ला केला आहे. हे 'आर्थिक युद्धाचे' (Economic Warfare) संकेत असून, यामुळे जागतिक बाजारपेठेत अॅल्युमिनियमच्या किमतीत कच्च्या तेलासारखीच अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठी बातम्या/विदेश/
Iran War: इराणच्या नव्या टार्गेटनं अमेरिकेची धास्ती वाढली, लष्करी तळानंतर आता निशाण्यावर कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल