TRENDING:

इराणच्या युद्ध रणनीतीत मोठा बदल; अमेरिका, इस्रायलला धमकी; राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला कबरीपर्यंत घेऊन जाऊ

Last Updated:

US-Israel Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अलीकडील हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या शेजारील देशांची माफी मागत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र इराणवर हल्ला झाल्यास कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेहरान: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शनिवारी अलीकडील इराणी हल्ल्यांमध्ये लक्ष्य बनलेल्या शेजारील देशांची माफी मागितली. त्यांनी स्पष्ट केले की, इराणवर हल्ले त्या देशांच्या भूमीतून झाले नाहीत, तोपर्यंत ते प्रादेशिक देशांवर हल्ले करणे टाळतील. इराणकडून ज्यांच्यावर हल्ले झाले त्या शेजारील देशांची मी माफी मागतो, असे पेझेश्कियान यांनी सरकारी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या भाषणात म्हटले.
News18
News18
advertisement

इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, इराणने अशी धोरणात्मक भूमिका स्वीकारली आहे की शेजारील देशांवर थेट हल्ले केले जाणार नाहीत, जोपर्यंत त्या देशांच्या भूमीतून इराणवर हल्ले केले जात नाहीत. इराणवर हल्ला त्या देशांच्या भूमीतून झाला नाही, तर इराण कोणत्याही शेजारील देशावर हल्ला किंवा क्षेपणास्त्र प्रहार करणार नाही, असे पेझेश्कियान यांनी सांगितल्याचे Iran Internationalने शनिवारी वृत्त दिले.

advertisement

पेझेश्कियान यांनी पुढे सांगितले की, हा निर्णय इराणच्या अंतरिम नेतृत्व परिषदेकडून मंजूर करण्यात आला आहे. प्रादेशिक देशांशी तणाव आणखी वाढू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी हेही नमूद केले की, इराणला आपल्या शेजारील देशांविषयी कोणतीही शत्रुत्वाची भावना नाही आणि या प्रदेशातील कोणत्याही सरकारशी संघर्ष करण्याची त्यांची इच्छा नाही. मात्र त्याचवेळी अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबतचा तणाव कायम आहे.

advertisement

पेझेश्कियान यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की इराण कधीही शरण जाणार नाही. इराणी जनतेला शरण येताना पाहण्याची शत्रूंची इच्छा त्यांच्या कबरीपर्यंतच जाईल, असे ते म्हणाले. गेल्या आठवडाभरापासून इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. हे हल्ले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येच्या प्रत्युत्तरात करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा फटका आखाती प्रदेशातील अनेक ठिकाणी बसला आहे. त्यामध्ये दुबई, अबुधाबी, कतार, कुवेत आणि बहरीन यांचा समावेश आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये या हल्ल्यांमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील विध्वंसाचे दृश्य दिसत आहेत.

advertisement

दरम्यान अमेरिका आणि इस्रायल यांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणमध्ये हवाई हल्ले केले होते. अणुकराराबाबतच्या चर्चेला आलेला ठप्पाव आणि इराणने पुन्हा अणुकार्यक्रम सुरू केल्याच्या आरोपांनंतर हे हल्ले करण्यात आले. “Operation Epic Fury” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कारवाईत इराणमधील अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामध्ये राजधानी तेहरानचा देखील समावेश होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अंधांना समजतील अडथळे, विद्यार्थ्यांने बनवली स्मार्ट स्टिक अन् खास गॉगल
सर्व पहा

या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांची मुलगी, जावई आणि नातही ठार झाल्याचे सांगितले जाते. खामेनेई यांची पत्नी Mansoureh Khojasteh Bagherzadeh या देखील या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या/विदेश/
इराणच्या युद्ध रणनीतीत मोठा बदल; अमेरिका, इस्रायलला धमकी; राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला कबरीपर्यंत घेऊन जाऊ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल