TRENDING:

israel iran war: इराणच्या धमकीनं अमेरिकेला फुटला घाम, जगभरात उडाली खळबळ

Last Updated:

अमेरिका-इराण युद्ध सहाव्या दिवशी सुरू आहे. अमेरिकन हल्ल्यात इराणचे ८७ सैनिक ठार. इराणने इस्रायलच्या परमाणु केंद्रांना टार्गेट करण्याची धमकी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमेरिका आणि इराणमधील युद्ध सलग सहाव्या दिवशी सुरू आहे. हा संघर्ष आता विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अमेरिकन युद्धनौकेने केलेल्या एका भीषण हल्ल्यात इराणचे तब्बल ८७ सैनिक ठार झाले असून, केवळ ३२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या प्रहारामुळे संतापलेल्या इराणने आता इस्रायलच्या परमाणु केंद्रांना टार्गेट करण्याची धमकी दिली असून, जगावर अण्वस्त्र युद्धाचे सावट पसरलं आहे.
News18
News18
advertisement

किती दिवस चालणार युद्ध, ट्रम्प यांनी थेट सांगितलं

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध लवकर थांबणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या मते, हे युद्ध पुढील ४ ते ५ आठवडे चालू शकते. दरम्यान, अमेरिकेच्या सीनेटमध्ये ट्रम्प यांचे युद्धविषयक अधिकार मर्यादित करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे, ज्यामुळे आता इराणविरुद्धच्या लष्करी कारवायांना अधिक वेग मिळणार आहे.

advertisement

समुद्रात इराणची मोठी नाकेबंदी

अमेरिकन सेंट्रल कमांडने दावा केला आहे की, आतापर्यंत इराणची २० हून अधिक जहाजे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. यामध्ये इराणच्या ताफ्यातील शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या 'सोलैमानी-क्लास' युद्धनौकेचाही समावेश आहे. अमेरिकेचे युद्ध सचिव पीट हेगसेथ यांनी म्हटले आहे की, जमीनवर सैन्य न उतरवता केवळ हवाई आणि सागरी ताकदीच्या जोरावर अमेरिका लवकरच संपूर्ण इराणवर नियंत्रण मिळवेल.

advertisement

पाच दिवसांत रक्ताचे सडे,मृतांचा आकडा धडकी भरवणारा

गेल्या पाच दिवसांत या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. इराणमध्ये आतापर्यंत १०९७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये १६८ निष्पाप मुले आणि एका शाळेवरील हल्ल्यात १४ शिक्षकांचा समावेश आहे. लेबनानमध्ये इस्रायली हल्ल्यात ७४ जणांचा बळी गेला. कुवैतमध्ये इराणच्या हल्ल्यात ६ अमेरिकन सैनिकांसह १० जण ठार झाले. UAE आणि बहरीनमध्ये आतापर्यंत इराणच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशच्या ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

advertisement

लेबनानमध्ये हाहाकार; १८ तासांचा ट्रॅफिक जॅम

इस्रायलने लेबनानमधील हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ले तीव्र केले आहेत. बेरूतच्या दक्षिण भागात तीन मोठे स्फोट झाले असून, जीव वाचवण्यासाठी हजारो नागरिक पळ काढत आहेत. दक्षिण लेबनानमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांवर १८ तासांहून अधिक काळ ट्रॅफिक जॅम लागला आहे. आतापर्यंत सुमारे ८४ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत.

advertisement

किंमत चुकवावी लागेल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कैरोलिन लेविट यांनी स्पष्ट शब्दात बजावले आहे की, इराणने अमेरिकेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांची किंमत आता त्यांना रक्ताने चुकवावी लागत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले कठोर निर्णय इराणला महागात पडत असल्याचे त्यांनी नमूद केलं.

मराठी बातम्या/विदेश/
israel iran war: इराणच्या धमकीनं अमेरिकेला फुटला घाम, जगभरात उडाली खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल