इराणी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, स्फोट त्या वेळी झाला जेव्हा एक सूत्रसंचालक थेट कार्यक्रमात इस्रायलवर टीका करत होता. काही क्षणांनी ती महिला स्क्रीनवरून निघून गेली आणि या घटनेचे फुटेज ऑनलाईन मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Israel-Iran युद्धात मोठी घडामोड; रशियाची ऑफर, इराणला सांगितले- तुमचे युरेनियम...
थेट कार्यक्रमाच्या वेळी, इराणी राज्यवाहिनीवरील एका पत्रकाराने सांगितले की, “वतनावर हल्ल्याचा आवाज" ऐकू आल्यानंतर स्टुडिओमध्ये धूळ उडाली होती.
advertisement
काही क्षणांतच एक स्फोट झाला, ज्यामुळे तिच्या मागील स्क्रीन तुटली आणि ती गडबडीत बाहेर पडली. त्यानंतर चॅनेलने थेट प्रसारण थांबवून रेकॉर्ड केलेला कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली. या घटनेच्या केवळ एक तास आधी इस्रायलने तेहरानमधील टीव्ही स्टुडिओ असलेल्या भागातील नागरिकांना बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.
इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला
सोमवारी सकाळी इराणने इस्रायलवर आणखी एक क्षेपणास्त्र हल्ला चढवला. ज्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला. उत्तरदाखल म्हणून, इस्रायलने तेहरानच्या मध्यवर्ती भागातील लाखो लोकांना बाहेर पडण्याचा इशारा दिला आणि आणखी हल्ल्यांची शक्यता वर्तवली. कारण संघर्ष चौथ्या दिवशीही सुरूच होता.
32 मिनिटांत नष्ट होईल जिन्नाचा देश; नेतन्याहू संपवतील भारताची डोकेदुखी
इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, या इशाऱ्याचा परिणाम तेहरानच्या मध्यवर्ती जिल्ह्यातील सुमारे 3,30,000 रहिवाशांवर झाला. जिथे देशाचे पोलीस मुख्यालय, राज्य प्रसारण कार्यालये आणि तीन मोठे रुग्णालये आहेत. त्यापैकी एक रुग्णालय इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डकडून चालवले जाते.
या क्षणी आम्ही सांगू शकतो की आमचे संपूर्ण हवाई वर्चस्व तेहरानच्या आकाशात आहे, असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते जनरल एफी डेफ्रिन यांनी सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, इस्रायली सैन्याने इराणच्या मध्यवर्ती भागात 120 पेक्षा अधिक जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचा नायनाट केला. जे देशाच्या एकूण क्षेपणास्त्र साठ्याच्या सुमारे एक तृतीयांश होते.
इस्रायली अधिकाऱ्यांनी यासोबतच असा दावा केला की, हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या परदेशी ऑपरेशन्स विभाग असलेल्या 'कुद्स फोर्स' च्या 10 कमांड केंद्रांना लक्ष्य करून नष्ट करण्यात आले आहे. हे हल्ले म्हणजे इराणच्या धोक्याला एक खोल आणि सर्वसमावेशक प्रतिघात आहे, असे डेफ्रिन म्हणाले.
दरम्यान इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी सुमारे 100 क्षेपणास्त्रे डागली असून देशाच्या लष्करी व अणु-सुविधांवर चालू असलेल्या हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी आणखी हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्यांमध्ये शुक्रवारपासून आतापर्यंत किमान 224 लोकांचा मृत्यू झाला आहे.