32 मिनिटांत नष्ट होईल जिन्नाचा देश, नेतन्याहू संपवतील भारताची डोकेदुखी; पाकचे खाण्यापिण्याचे वांदे अन् इराणसाठी इस्रायलशी पंगा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Israel Iran Conflict: इस्रायल-इराण संघर्षात आता पाकिस्तानने उडी घेतल्याने जगभर खळबळ उडाली आहे. इराणला दिलेल्या अणुबॉम्बच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तान स्वतःच इस्रायली निशाण्यावर आल्याची भीती व्यक्त होते आहे.
तेल अवीव: सध्या जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेन गेली तीन वर्षं एकमेकांशी लढत आहेत. तर दुसरीकडे ऑक्टोबर 2023 पासून इस्रायल गाझा पट्ट्यात हमासविरोधात सैन्य मोहीम चालवत आहे. आता यामध्ये आणखी एक संघर्षाचा मोर्चा उघडला गेला आहे. इस्रायलने थेट इराणशी टक्कर घेतली आहे.
13 जून रोजी इस्रायलने जवळपास 200 फायटर जेट्ससह इराणवरील सैन्य आणि अणुठिकाण्यांवर हवाई हल्ला चढवला. या कारवाईनंतर इराणने क्षेपणास्त्रांचा मारा करत त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतरही संघर्ष थांबला नाही. उलट दोन्ही देश एकमेकांच्या हल्ल्यांना उत्तर देत राहिले आहेत.
इस्रायली हल्ल्यांनी तेहरानला पूर आला, घरे बुडू लागली, सर्वत्र अराजकता पसरली
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचं नावही पुढे आलं आहे. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सदस्य मोहसिन रेजाई यांनी एक खळबळजनक विधान करत सांगितलं की, जर इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब हल्ला केला. तर पाकिस्तान देखील इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल, असा विश्वास पाकिस्तानने इराणला दिला आहे.
advertisement
या विधानानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. कारण आधीच पाकिस्तानमध्ये भीती आहे की, इराणनंतर इस्रायलचा पुढचा निशाणा तोच असू शकतो.
टायमर सुरू झाला आहे, एकही मूल जन्माला न आलं तर?; वैज्ञानिकांनी दिलं भयावह उत्तर
आता प्रश्न निर्माण होतो की, जर इस्रायल आणि पाकिस्तानमध्ये थेट क्षेपणास्त्र हल्ले झाले. तर कोणाची मिसाइल दुसऱ्या देशावर आधी हिट करेल?
advertisement
इस्रायलची क्षेपणास्त्र क्षमता
>इस्रायलकडे जेरिको-3 बॅलिस्टिक मिसाइल आहे.
>याची मारक क्षमता सुमारे 4,800 ते 6,500 किमी पर्यंत आहे.
>काही रिपोर्टनुसार ही रेंज 11,000 किमी पेक्षाही अधिक आहे.
>ही हायपरसोनिक मिसाइल असून Mach 6 वेगाने झेप घेते.
इस्रायल ते पाकिस्तानचे अंतर सुमारे 3,283 किमी आहे. त्यामुळे ही मिसाइल 32 मिनिटांत पाकिस्तानला लक्ष्य करू शकते.
advertisement
पाकिस्तानची ताकद
>पाकिस्तानकडे सध्या सर्वात ताकदवान मिसाइल म्हणजे Shaheen-III.
>याची मारक क्षमता 2,700 किमी पर्यंत आहे.
>ही मिसाइल मुख्यतः भारताला लक्ष करून तयार करण्यात आली होती.
>इस्रायलपर्यंत पोहोचण्यासाठी ही मिसाइल अपुरी आहे.
त्यामुळे पाकिस्तानला जर इस्रायलवर हल्ला करायचा असेल. तर त्याला जवळचे लॉन्चपॅड्स किंवा नवीन प्रणाली आवश्यक आहे.
इस्रायलवर हल्ला करणे पाकिस्तानसाठी सोपं नाही
पाकिस्तानने इराणला अणुहल्ल्याचा आश्वास दिलं असलं तरी प्रत्यक्षात इस्रायलपर्यंत अणुबॉम्ब नेणारी मिसाइल प्रणाली त्यांच्याकडे सध्या नाही. अशा प्रणाली विकसित करायला वेळ लागतो आणि अमेरिका कधीच पाकिस्तानला हे करु देणार नाही.
advertisement
तांत्रिकदृष्ट्या इस्रायलच्या मिसाइल्स वेगवान, अचूक आणि लांब पल्ल्याच्या आहेत. त्यामुळे जर संघर्ष झाला तर इस्रायलची मिसाइल आधी लक्ष्य गाठू शकते. तांत्रिक आणि सामरिक दृष्टीने पाहता पाकिस्तान इस्रायलच्या समोर अजिबात टिकत नाही आणि थेट संघर्ष झाल्यास इस्रायलचं प्राबल्य अधिक असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 16, 2025 3:32 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
32 मिनिटांत नष्ट होईल जिन्नाचा देश, नेतन्याहू संपवतील भारताची डोकेदुखी; पाकचे खाण्यापिण्याचे वांदे अन् इराणसाठी इस्रायलशी पंगा