विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाला आहे. जगभरातील बँक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशातील शेअर्स देखील दुसऱ्या सत्रात कोसळल्याचं दिसलं. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. जगभरातील मोठी विमानतळं ठप्प झाली आहेत.
जगभरातील अनेक विमानतळांवर वेब चेक-इन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह देशातील अनेक विमानतळांवर प्रवासी ताटकळत थांबले आहेत. Akasa Air ने प्रवाशांना सांगितले आहे की ते विमानतळांवर मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग सुविधा देत आहेत., इंडिगो, आकासा एअर आणि स्पाइसजेटने चेक-इनसाठी वापरलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अडचण आली आहे.
advertisement
या तिन्ही एअरलाईन्स GoNow चेक-इन सिस्टम वापरतात, ज्याने सकाळी 10.45 वाजता जगभरात तांत्रिक अडचणींचा सामना करण्यास सुरुवात केली. एअरलाइन्स मायक्रोसॉफ्टसोबत सकाळी 10 वाजल्यापासून काम करत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
