TRENDING:

Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीत कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारा Video

Last Updated:

Bus Falls in River : फेरी टर्मिनलजवळ प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस थेट पद्मा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत २३ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ढाका: बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. दौलतदिया फेरी टर्मिनलजवळ प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस थेट पद्मा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत २३ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रभर बचाव कार्य सुरू होते. काही प्रवासी सुखरुप वाचले. मात्र,अनेक प्रवाशांना बस बाहेर पडता आले नसल्याचे काहींनी सांगितले आहे.
प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीत कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारा Video
प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीत कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारा Video
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 'सौहार्दो परिवहन'ची ही बस राजबारीहून ढाकाकडे जात होती. संध्याकाळी ५ च्या सुमारास दौलतदिया फेरी टर्मिनल क्रमांक ३ वर बस फेरीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस वेगाने नदीच्या पात्रात कोसळली. बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते, ज्यातील अनेक जण बससोबतच पाण्यात बुडाले.

advertisement

advertisement

'डोळ्यांदेखत पत्नी आणि मुलगा वाहून गेले'

या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेल्या अब्दुल अजीजुल या प्रवाशाने आपला टाहो फोडत सांगितले की, "मी कसाबसा पोहून काठावर आलो, पण माझी पत्नी आणि पोटचा मुलगा माझ्या डोळ्यांदेखत नदीत बुडाले." असेच अनेक प्रवासी आपल्या जवळच्या व्यक्तींना वाचवू शकले नाहीत. नदीकाठी जमलेल्या नातेवाईकांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर हेलावून गेला आहे.

advertisement

बचाव कार्यात अडथळा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

अपघात झाला तेव्हा अंधार पडू लागला होता, त्यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी आल्या. पोलीस इन्स्पेक्टर रसेल मुल्ला यांनी सांगितले की, रात्री उशिरापर्यंत २३ मृतदेह हाती लागले आहेत. अग्निशमन दल, नौसेना आणि पोलिसांनी मिळून 'हमजा' नावाच्या बचाव जहाजाच्या मदतीने ६ तासांच्या प्रयत्नानंतर बसला पाण्याबाहेर काढले. अद्यापही काही प्रवासी बेपत्ता असून शोधमोहीम सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/विदेश/
Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पद्मा नदीत कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल